पिनाका रॉकेटची पहिली उड्डाण चाचणी यशस्वी झाली.
120 किमीचा मारक पल्ला : लक्ष्याचा अचूक भेद : सैन्याच्या ताफ्यात सामील करण्यास मंजुरी
वृत्तसंस्था/ चांदीपूर
भारताने ओडिशाच्या चांदीपूर येथील इंटीग्रेटेड टेस्ट रेंजमधून पिनाका लाँग रेंज गायडेड रॉकेटचे (एलआरजीआर-120) पहिले यशस्वी फ्लाइट टेस्टिंग केले आहे. यादरम्यान रॉकेटला त्याच्या कमाल 120 किलोमीटरच्या मारक पल्ल्यापर्यंत डागण्यात आले. उ•ाणादरम्यान रॉकेटन सर्व निर्धारित इन-फ्लाइड मॅन्युवर यशस्वीपणे पूर्ण पेले आणि निर्धारित लक्ष्यावर अचूक वार केला आहे. रेंजमध्ये तैनात सर्व ट्रॅकिंग सिस्टीमने उ•ाणाच्या पूर्ण मार्गादरम्यान रॉकेटवर नजर ठेवली. हे यशस्वी परीक्षण डीआरडीओकडून करण्यात आले आहे.
एलआरजीआरला आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टेब्लिशमेंटने हाय एनर्जी मटीरियल्स रिसर्च लॅबोरेट्रीसोबत मिळून डिझाइन केले आहे. तर याच्या निर्मितीत डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबोरेट्री अणि रिसर्च सेंटरने मदत केली आहे. या फ्लाइट टेस्टिंगचे संचालन इंटीग्रेटेड टेस्ट रेंज आणि प्रूफ अँड एक्सपेरिमेंटल एस्टेब्लेशमेंटने केले. रॉकेटला सैन्यात पूर्वीपासून वापरत होत असलेल्या पिनाका लाँचरने डागण्यात आले, यामुळे एकाच लाँचरमधून विविध मारक पल्ल्याची पिनाका रॉकेट्स डागली जाऊ शकतात हे सिद्ध झाले.
वेगवान अन् अचूक हल्ल्यासाठी ओळख
पिनाका रॉकेट सिस्टीम भारताचे स्वदेशी मल्टी-बॅरेल रॉकेट लाँचर (एमबीआरएल) असून ते डीआरडीओने विकसित केले आहे. भारतीय सैन्य याचा वापर दीर्घ अंतरावरील हल्ल्यासाठी करते. हे जीपीएस नेव्हिगेशनच्या मदतीने वेगवान आणि अचूक हल्ल्यासाठी ओळखले जाते. पिनाका रॉकेट लाँचर ट्रकमधून वाहून नेता येते, एका ट्रकमध्ये 12 रॉकेट ट्यूब असतात. कमी वेळत अनेक रॉकेट डागून दीर्घ अंतरावरील शत्रूला धडा शिकविण्यास ही प्रणाली सहाय्यभूत आहे. पिनाकाला स्वदेशी शस्त्रास्त्र प्रणालीत एक यशस्वी प्रणाली मानण्यात येते. संरक्षण निर्यातीच्या क्षेत्रातही पिनाका सिस्टीमला यश मिळाले आहे. आर्मेनियाने ही प्रणाली भारताकडून खरेदी केली आहे, तर फ्रान्ससमवेत अनेक युरोपीय देशांनी याच्या खरेदीत रुची दाखविली आहे.
डीआरडीओचे अभिनंदन
यशस्वी परीक्षणानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचे अभिनंदन पेले आहे. दीर्घ पल्ल्याच्या गायडेड रॉकेट्सचा विकास सशस्त्रदलांच्या क्षमतांना मजबूत करणार असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष समीर कामत यांनी मोहीम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या टीम्सचे कौतुक केले आहे.
Comments are closed.