पहिला टी20 सामना पावसामुळे नाही, तर ‘कर्फ्यू’मुळे रद्द! कॅनबऱ्यामध्ये नवा नियम लागू

वनडे मालिका संपल्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात झाली आहे. मात्र, कॅनबरा येथे खेळवण्यात आलेला पहिला टी-20 सामना रद्द करण्यात आला. सुरुवातीपासूनच या सामन्यात पावसामुळे खेळात खंड पडत होता आणि काही वेळानंतर अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पण आता अशी माहिती समोर आली आहे की, सामना रद्द होण्यामागे केवळ पावसाचं कारण नव्हतं. कारण पावसादरम्यान घडलेली एक गोष्ट सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी ठरली. साधारणपणे टी-20 सामन्यांमध्ये अशी परिस्थिती पाहायला मिळत नाही. सामना सुरू झाल्यानंतर सुमारे 5 षटकांनी हलका पाऊस सुरू झाला. पाऊस थांबल्यानंतर सामना पुन्हा सुरू होण्यासाठी सुमारे 40 मिनिटांचा वेळ गेला.

यानंतर सामना 18- 18 षटकांचा करण्यात आला, म्हणजे प्रत्येकी दोन षटके कमी करण्यात आली. साधारणपणे इतक्या कमी वेळासाठी सामना थांबला तर ओव्हर्स कमी केले जात नाहीत, पण या वेळी तसं झालं. यामागचं कारण म्हणजे कॅनबरा मैदानावरील ‘फ्लडलाइट कर्फ्यू’ नियम.

या नियमानुसार रात्री 11 वाजल्यानंतर स्टेडियममधील लाईट्स बंद कराव्या लागतात, कारण हे मैदान रहिवासी परिसरात आहे. त्यामुळे खेळ ठरलेल्या वेळेत संपवण्यासाठी सामन्यात ओव्हर्स कमी करावे लागले.

Comments are closed.