पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला आज हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
पंतप्रधान मोदींचा आजपासून पश्चिम बंगाल, आसाम दौरा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान मोदी शनिवारी पश्चिम बंगाल आणि आसामच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर रवाना होतील. या भेटीदरम्यान ते दोन्ही राज्यांमध्ये हजारो कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. पंतप्रधान मोदी आसाममधून दोन नवीन अमृत भारत एक्स्प्रेस गाड्या आणि पश्चिम बंगालमधून भारतातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. पंतप्रधान मोदी रविवारी नागांव येथे दोन नवीन अमृत भारत एक्स्प्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. या नवीन रेल्वेसेवा ईशान्य आणि उत्तर भारतामधील रेल्वे कनेक्टिव्हिटी मजबूत करणार असल्यामुळे लोकांसाठी सुरक्षित आणि अधिक सोयीस्कर प्रवास शक्य होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमधील मालदा येथून आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्याला सुरुवात करतील. 17 जानेवारी रोजी दुपारी 12:45 वाजता ते मालदा येथे पोहोचतील. त्यानंतर ते मालदा टाउन रेल्वे स्टेशनवर हावडा आणि गुवाहाटी (कामाख्या) दरम्यान भारतातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. दुपारी 1:45 वाजता, पंतप्रधान मोदी मालदा येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात 3,250 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांचे राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील. 17 जानेवारी रोजी मालदा येथे होणाऱ्या कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी संध्याकाळी आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचतील. तेथे ते संध्याकाळी 6 वाजता पारंपारिक बोडो सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतील.
18 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता, पंतप्रधान मोदी नागांव जिह्यातील कालियाबोर येथे 6,950 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या काझीरंगा एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाचे भूमिपूजन करतील. 86 किलोमीटर लांबीचा काझीरंगा एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्प हा पर्यावरणपूरक राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प आहे. यामध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातून जाणारा 35 किलोमीटरचा एलिव्हेटेड वन्यजीव कॉरिडॉर, 21 किलोमीटरचा बायपास विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग-715 च्या विद्यमान महामार्ग विभागाचे दोन ते चार पदरी रुंदीकरण यांचा समावेश असेल. पंतप्रधान रविवार, 18 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता हुगळी जिह्यातील सिंगूर येथे सुमारे 830 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. त्याचदिवशी, पंतप्रधान मोदी तीन अमृत भारत एक्स्प्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील.
Comments are closed.