वर्तमानपत्रात गुंडाळून वडापाव विकता येणार नाही; विक्रेत्यांवर वॉच

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ विकणारे विक्रेते अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) रडारवर आले आहेत. वर्तमानपत्रात गुंडाळून खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर आता कडक कारवाई होणार आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यानंतर पनीर विक्रेते, औषध विक्रेते, गुटखा आणि पानमसाला विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या विरोधात कारवाई करीत असताना अनेक ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये गुंडाळून खाद्यपदार्थ खासकरून वडापाव-भजीपाव दिले जात असल्याचे तुकाराम मुंढे यांच्या लक्षात आले. वास्तविक वर्तमानपत्रात गुंडाळून खाद्यपदार्थ विकण्यास पूर्वीपासून बंदी आहे.

वर्तमानपत्राची शाई प्राणघातक असते

गरम वडय़ाचे तेल वर्तमानपत्रामध्ये मिसळते. वर्तमानपत्राची शाई या तेलात मिसळली जाते. वडा आणि भजीसोबत काळी शाई माणसाच्या पोटात जाते. ही शाई आरोग्याला घातक ठरू शकते. कारण शाईमध्ये शिसे, झिंक, पॅडमियन यासारखे घातक धातू असतात. हे अन्नपदार्थांतून पोटात गेल्यास गंभीर आजार होऊ शकतात.

विक्रेत्यांकडून बटर पेपरचा वापर

वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ विकण्यास बंदी केल्यामुळे आता बटर पेपरमध्ये खाद्यपदार्थ खासकरून वडापाव, भजीपाव, समोसे सॅण्डवीच यांच्यासारखे अन्य खाद्यपदार्थ बांधण्यासाठी बटर पेपरचा वापर होतो. हे खाद्यपदार्थ बटर पेपरमध्ये ठेवून मग वर्तमानपत्रात बांधले जातात. हल्ली अनेक ठिकाणी रस्त्यांवरच्या खाद्यपदार्थांच्या गाडय़ांवर आणि हॉटेलमध्येही इडली, मेदूवडा, मसाला डोसा असे खाद्यपदार्थ सिल्व्हर फॉईल किंवा बटर पेपरमध्ये बांधून दिले जातात.

Comments are closed.