AUS vs ENG: गाबा कसोटीत मार्नस लाबुशेनचा जागतिक विक्रम! ही कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू
ऍशेस (Ashes 2025-26) मालिकेतील गाबा कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज मार्नस लाबुशेनने (Marnus Labushen) उत्कृष्ट कामगिरी करत एक जागतिक विक्रम आपल्या नावावर केला. लाबुशेनच्या शानदार फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाचा संघ सामन्यात मजबूत स्थितीत पोहोचला आहे. मालिकेत 1-0 ने पिछाडीवर असलेली इंग्लंडची टीम आता गाबा कसोटीतही मागे पडली आहे. लाबुशेननंतर या एलिट लिस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा आणखी एक स्टार खेळाडू, स्टीव्ह स्मिथ, दुसऱ्या स्थानावर आहे.
गाबा कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात 334 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला चांगली सुरुवात मिळाली. संघाचा स्टार खेळाडू मार्नस लाबुशेनने सलामी फलंदाज जेक वेदरल्डला चांगली साथ दिली. लाबुशेनने 78 चेंडूंमध्ये 65 धावांची खेळी केली.
या खेळीसह, डे-नाईट (Day-Night) कसोटी सामन्यांमध्ये 1,000 हजार धावा पूर्ण करणारा लाबुशेन हा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. लाबुशेनने हा पराक्रम आपल्या 16व्या डावातच केला. डे-नाईट कसोटी सामन्यांमध्ये लाबुशेन नेहमीच चांगली कामगिरी करतो आणि त्याने आपला हा फॉर्म या सामन्यातही कायम ठेवला. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) असून तिसऱ्या स्थानावर डेव्हिड वॉर्नर (David Warner) कायम आहे. वॉर्नरच्या नावावर 753 धावांची नोंद आहे, तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या ट्रॅव्हिस हेडच्या (Travis Head) नावावर 752 धावा आहेत.
या सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास, लाबुशेन व्यतिरिक्त जेक वेदरल्डनेही 72 धावांची महत्त्वाची खेळी केली, तर कर्णधार स्टीव्हन स्मिथनेही 61 धावा जोडल्या. याच कारणामुळे, ही बातमी लिहेपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या संघाने 6 गड्यांच्या मोबदल्यात 372 धावा केल्या होत्या आणि त्यांच्याकडे पहिल्या डावाच्या आधारावर 38 धावांची आघाडी मिळाली होती.
Comments are closed.