2025 मध्ये कोणाचं वर्चस्व? कोणत्या महिला क्रिकेटपटूने मोडला विराट कोहलीच्या वेगवान शतकाचा विक्रम
1983 मध्ये कपिल देव (Kapil Dev) यांच्या संघाने जो पराक्रम केला होता, तसाच काहीसा चमत्कार 2025 मध्ये भारतीय महिला संघाने करून दाखवला. दक्षिण आफ्रिकेचा फायनलमध्ये पराभव करत भारताने पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकला आणि महिला क्रिकेटचा चेहरामोहरा बदलून टाकला.
या वर्ल्ड कपमध्ये स्मृती मानधनाने ( Smriti Mandhna) 434 धावा करून भारतीय फलंदाजीचा कणा असल्याचे सिद्ध केले. तिने 8 सामन्यांत 55 च्या सरासरीने 434 धावा करत 1 शतक आणि 2 अर्धशतके केली आहे. मानधनाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिल्ली वनडेत अवघ्या 50 चेंडूंत शतक झळकावून विराट कोहलीचा (52 चेंडू) विक्रम मोडला. तिने 63 चेंडूंत 125 धावांची खेळी केली. या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्वार्ड्टने सर्वाधिक 571 धावा केल्या.
आग्र्याच्या दीप्ति शर्माला (Deepti Sharma) या वर्ल्ड कपमध्ये ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’चा किताब मिळाला. वर्ल्ड कपमध्ये 20 पेक्षा जास्त विकेट्स आणि 200 पेक्षा जास्त धावा करणारी ती पहिली क्रिकेटपटू ठरली. दीप्ति सध्या जगातील नंबर 1 ऑलराउंडर आहे. तिने 151 टी-20 विकेट्स घेऊन ऑस्ट्रेलियाच्या मेगान शटची बरोबरी केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिच्या नावावर 333 विकेट्स आहेत, ती झूलन गोस्वामीच्या (355 विकेट्स) विक्रमाच्या जवळ पोहोचली आहे.
वर्ल्ड कप विजेती कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) आता टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारी कर्णधार बनली आहे. हरमनप्रीतने 130 सामन्यांपैकी 76 सामन्यांत विजय मिळवून ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंगची बरोबरी केली आहे. विजयांच्या बाबतीत ती आता लवकरच जगातील सर्वात यशस्वी कर्णधार बनेल.
Comments are closed.