राज्यासमोर विविध प्रश्न असताना सरकार फक्त गाजर दाखवत आहे; आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले

राज्यासमोर विविध प्रश्न आहेत, मात्र सरकार फक्त गाजर दाखवण्याचे काम करत आहे. जनतेच्या प्रश्नांबाबत सरकार संवेदनशील नाही, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच फटकारले. तसेच आता मराठी माणूस एकत्र झाल्याने महाराष्ट्रद्वेष्ट्या भाजपच्या पोटात दुखत आहे, असेही ते म्हणाले.
राज्यासमोर विविध प्रश्न असले तरी सरकार फक्त गाजर दाखवण्याचे काम करत आहे. तसेच कोणत्याही समस्यांबाबत सरकार संवेदनशील नाही. गेल्या आठवड्यात 750 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्याबाबत आवाज उठवल्यावर विरोधी पक्षाच्या आमदाराला सभागृहातून निलंबित करण्यात आले. दुसऱ्या दिवशीही आम्ही हा प्रश्न उपस्थित केला. मात्र, हे सरकार राज्याचे नसून निवडणूक आयोगाचे आहे. त्यामुळे राज्यातील जनतेचे प्रश्नांशी त्यांना काहीही देणे-घेणे नाही, असे दिसत आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
मराठी माणूक एकत्र येत आहे, मराठी माणसाची एकी दिसत आहे, तर महाराष्ट्रद्वेष्ट्या भाजपच्या पोटात दुखत आहे. महाराष्ट्राला दिल्लीसमोर झुकवण्याची इच्छा असणाऱ्यांना पोटदुखी होत आहे. मात्र, मराठी माणसाची एकी, आनंद राज्यभरात दिसत आहे. मिंधे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपमान्स्पद वक्तव्य केले आहे. आता त्यांच्या गटाचे प्रमुख यावर कारवाई करणार की सत्तेसाठी हे खपवून घेणार, हा प्रश्न उभा राहत आहे. याकडे राज्याचे लक्ष आहे, असे ते म्हणाले.
प्रतार सरनाईक यांना शिंदेंना पत्र लिहिण्याची गरज का भासली? असा सवालही त्यांनी केला. ते फक्त सत्तेसाठी एकमेंकाजवळ आहेत. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्यात अनेक वाद आहेत. सत्तेसाठी त्यांची ही नौटंकी सुरू आहे. त्यामुळे त्यांच्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही. मिंधेनी महाराष्ट्रात जय गुजरातची घोषणा केली आहे. भाजपने मराठी माणसांची तुलना पकड्यांशी केली आहे. त्यावरून भाजपला महाराष्ट्र आणि मराठी माणसाबाबत किती द्वेष आहे, ते दिसून येते, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
Comments are closed.