सर्वात उंचावरील पेट्रोल पंप

हिमाचल प्रदेशच्या दुर्गम आणि सुंदर स्पीति खोऱ्यातील काजा पुन्हा चर्चेत आहे. येथील इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप जगातील सर्वात उंच अन् सर्वात छोट्या पेट्रोल पंपापैकी एका मानला जातो. समुद्रसपाटीपासून सुमारे 12,270 फुटांच्या उंचीवरील हा पेट्रोल पंप केवळ स्वत:चे लोकेशन नव्हे तर साधेपणा आणि उपयुक्ततेमुळेही खास ओळख राखून आहे.

काजा हे स्पीति उपविभागाचे मुख्यालय आहे. वर्षात बहुतांश काळ येथील लोक अत्यंत थंड आणि प्रतिकूल हवामानाचा सामना करतात. अशास्थितीत येथील इंधनाची उपलब्धता अत्यंत आव्हानात्मक काम असते. या समस्येवर मात करण्यासाठी इंडियन ऑइलने येथे छोटासा पेट्रोल पंप निर्माण केला आहे. हा पंप कुठल्याही मोठ्या शहरातील आधुनिक पेट्रोल पंपांसारखा नाही. तर एक साधारण स्टॉलप्रमाणे आहे, ज्यात केवळ एक यंत्र लावण्यात आले असून कुठलेच मोठे शेड नाही.

या पेट्रोल पंपाचे वैशिष्ट्या केवळ उंच भाग नसून याचे खास महत्त्व देखील आहे. स्पीति खोऱ्यात प्रवास करणारे पर्यटक, स्थानिक रहिवासी आणि सरकारी वाहनांसाठी हा पंप जीवनरेषेप्रमाणे काम करतो. दीर्घ प्रवासादरम्यान येथे इंधनाची सुविधा मिळणे अत्यंत आवश्यक असते. कारण आसपास अनेक किलोमीटरपर्यंत कुठलाच अन्य पेट्रोल पंप नाही.

इंधन पोहोचविणे आव्हान

कडाक्याच्या थंडीत तापमान शून्यापेक्षा कमी होत असते आणि हिमवृष्टीमुळे मार्ग बंद होतात तेव्हा या पेट्रोल पंपापर्यंत इंधन पोहोचविणे मोठे आव्हान ठरते. तरीही स्थानिक प्रशासन गरजेच्या प्रसंगी येथे इंधनाची कमतरता निर्माण होणार नाही हे सुनिश्चित करते. पर्यटकांसाठी देखील हा पेट्रोल पंप एखाद्या आकर्षणापेक्षा कमी नाही. स्पीति खोऱ्याच्या प्रवासावर येणारे लोक येथे थांबून फोटो काढून घेतात आणि या अनोख्या ठिकाणाचा अनुभव घेतात. सोशल मीडियावर देखील हा पेट्रोल पंप अनेकदा व्हायरल होत असतो. काजा येथील हा छोटासा पेट्रोल पंप कठिणातील कठिण स्थितीतही सुविधा पोहोचविल्या जाऊ शकतात हे सिद्ध करतो. हे केवळ इंजिनियरिंग आणि व्यवस्थापनाचे उदाहरण नसून दुर्गम भागांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी एक मोठा दिलासा देखील आहे.

Comments are closed.