द हंड्रेड 2026 लिलावासाठी पाकिस्तानचे 14 खेळाडू शॉर्टलिस्ट, वर्ल्ड कपमध्ये दोन शतके झळकावणाऱ्या या खेळाडूकडे दुर्लक्ष
इंग्लंडच्या क्रिकेट लीग द हंड्रेड 2026 चा लिलाव 12 मार्च रोजी होणार आहे. ESPNcricinfo च्या वृत्तानुसार, पाकिस्तानमधील 63 खेळाडूंनी त्यांची नावे नोंदवली होती, त्यापैकी केवळ 14 खेळाडू अंतिम निवड यादीत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले.
शॉर्टलिस्ट केलेल्या खेळाडूंमध्ये शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, शादाब खान, सॅम अयुब आणि नसीम शाह यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. हरिस रौफला लिलावात प्रमुख खेळाडूंच्या श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे 2026 च्या टी-20 विश्वचषकासाठी रौफचा पाकिस्तान संघात समावेश करण्यात आला नव्हता, परंतु असे असतानाही त्याला द हंड्रेडच्या लिलावात स्थान मिळाले आहे.
Comments are closed.