आयसीसीने नोव्हेंबर महिन्यासाठी 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कारासाठी केले नामांकन जाहीर! यादीत फक्त एक भारतीय खेळाडू समाविष्ट
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने नोव्हेंबर 2025 साठी ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्काराचे नामांकन जाहीर केले आहे. नोव्हेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक थरारक सामने पाहायला मिळाले, ज्यात महिला एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना देखील समाविष्ट होता. या दरम्यान अनेक खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळच्या पुरुष खेळाडूंच्या (Mens Category) नामांकनामध्ये एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. पण महिला खेळाडूंच्या यादीत भारतीय संघाची सलामीवीर (Opening Batsman) शेफाली वर्माच्या (Shefali verma) नावाचा समावेश आहे. या नामांकित खेळाडूंच्या यादीत ती एकमेव भारतीय खेळाडू आहे. विश्वचषक 2025 च्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) शेफालीने जबरदस्त कामगिरी करत भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
सलामीवीर प्रतिका रावल (Pratika Raval) जखमी झाल्यामुळे तिला संघात स्थान देण्यात आले होते. शेफालीने फायनलमध्ये 87 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली आणि गोलंदाजीमध्येही 2 महत्त्वाचे बळी घेतले. या दमदार कामगिरीमुळेच आयसीसीने शेफालीला ‘महिला प्लेयर ऑफ द मंथ’ साठी नामांकित केले आहे. परंतु, हा पुरस्कार जिंकण्यासाठी तिला यूएईची ईशा ओझा आणि थायलंडची थिपाचा पुथावोंग यांसारख्या खेळाडूंकडून कठीण आव्हान मिळणार आहे, कारण त्यांनी महिला इमर्जिंग नेशन्स ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले होते.
पुरुष विभागात नोव्हेंबर महिन्यासाठी तीन खेळाडूंना नामांकन मिळाले आहे. दक्षिण आफ्रिकेचा सायमन हार्मर (Simon Harmer) त्याने भारताच्या दौऱ्यावर झालेल्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि एकूण 17 बळी घेतले. त्याला ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ पुरस्कारही मिळाला. बांग्लादेशचा तैजुल इस्लाम (Taijul Islam) याने आयर्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत एकूण 13 बळी मिळवले. पाकिस्तानचा मोहम्मद नवाज (Mohammad Nawaz) ने टी20 ट्राय सिरीजमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले. या पुरस्कारासाठी तिन्ही खेळाडूंमध्ये मोठी आणि चुरशीची स्पर्धा होण्याची शक्यता आहे.
Comments are closed.