भारताची धावांचा पाठलाग करताना धोकादायक आकडेवारी, आयसीसी वनडेमध्ये मोठी चिंता!

यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीतील (ICC Champions Trophy 2025) पहिला सेमीफायनल सामना भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia Semifinal 1) संघात रंगला आहे. दरम्यान दोन्ही संघ दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आमने-सामने आहेत. यादरम्यान प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 265 धावांचे आव्हान ठेवले आहे. आता या आव्हानाचा पाठलगा करताना भारतीय संघ यशस्वी होतो का? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल.

आता जर आपण आयसीसी वनडे स्पर्धेतील रेकॉर्ड्स पाहिले तर भारतीय चाहत्यांचे टेन्शन वाढेल. कारण लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाचा रेकॉर्ड आयसीसी वनडे स्पर्धांमध्ये खूपच खराब राहिला आहे.

आयसीसी वनडे स्पर्धांमध्ये धावांचा पाठलाग करण्याचा भारतीय क्रिकेट संघाचा इतिहास खराब आहे. भारताला एकूण 9 सामन्यांमध्ये लक्ष्याचा पाठलाग करावा लागला आहे परंतु, भारत यापैकी फक्त 2 सामन्यांमध्ये विजय मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. दरम्यान संघाला 7 वेळा पराभवाचा सामना करावा लागला.

भारताला आता इतिहास रचायचा आहे आणि चॅम्पियन्स ट्राॅफीच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी 265 धावांचे लक्ष्य गाठायचे आहे, त्यामुळे संघाच्या अव्वल फलंदाजांनी चांगली कामगिरी करणे खूप महत्त्वाचे आहे. या स्पर्धेत याच मैदानावर विराट कोहलीने (Virat Kohli) पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावले होते, आजही तो मोठी खेळी करेल अशी अपेक्षा आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs AUS: स्मिथ-कॅरीचे अर्धशतक! कांगारूंचे भारतासमोर 265 धावांचे आव्हान
कोहलीसाठी स्टेडियममध्ये फॅन्सची गर्दी, विराटसाठी काय म्हणाले चाहते?
टॅव्हिस हेडच्या विकेटवर अनुष्का शर्माची प्रतिक्रिया व्हायरल, पाहा VIDEO!

Comments are closed.