राजकीय क्षेत्रात 'बौद्धिक नक्षल' पक्ष
पंतप्रधानांच्या टिप्पणीनंतर स्थापना
वृत्तसंस्था नवी दिल्ली
‘कॉकरोच जनता पार्टी“नंतर आता मैदानात एक नवा पक्ष आला आहे. त्याचे नाव ‘दिमागी नक्सल पार्टी“ असून आतापर्यंत लाखो लोक याच्याशी सोशल मीडियावर जोडले गेले आहेत. 80 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्याच्या प्राचीरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘दिमागी नक्सल“ शब्दाचा वापर केला होता. आता त्याच शब्दाने देशाच्या राजकीय वर्तुळासोबत सोशल मीडियावरही मोठ्या हालचालींना जन्म दिला आहे. या भाषणानंतर त्वरित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘दिमागी नक्सल पार्टी“ नावाने एक पेज उदयास आले असून ज्याने केवळ 24 तासांमध्ये 1 लाखाहून अधिक आणि दोन दिवसांच्या आत 1.8 लाखाहून अधिक फॉलोअर्स प्राप्त करत इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे.
परंतु हा काही अधिकृत किंवा मान्यताप्राप्त राजकीय पक्ष नाही, तर पंतप्रधानांच्या भाषणातील उल्लेखावरून जन्माला आलेला एक सोशल मीडिया पुढाकार आहे. पक्षाचे एक्सवरही ‘दिमागी नक्सल जनता पार्टी“ नावाने एक अकौंट आहे. इन्स्टाग्राम आणि एक्सवर पार्टीच्या बायोनुसार याचा मोटो ‘सोचो, रिसर्च करो, विरोध करो“ आहे. इन्स्टाग्राम बायोमध्ये पक्षाचा संस्थापक ‘एक दिमागी भारतीय“ आहे, तर सह-संस्थापक ‘56 इंचा“चा व्यक्ती असल्याचे म्हटले गेले आहे.
संस्थापक कोण?
पक्ष स्वत:ला भगत सिंह यांच्या विचारसरणीचा अनुयायी असल्याचे म्हणवून घेतो. परंतु हा सोशल मीडिया पुढाकार कुणी निर्माण केला आणि इन्स्टाग्राम अकौंट कधी तयार करण्यात आले होते हे कळलेले नाही. परंतु पक्षाचे एक्सवरील अकौंट चालू महिन्यात निर्माण करण्यात आले होते.
हा डिजिटल हँडल इन्स्टाग्रामवर अनेक चर्चित चेहऱ्यांना फॉलो करत असून यात कुणाल कामरा, श्याम रंगीला, युट्यूबर ध्रूव राठी, प्रकाश राज, अनुराग कश्यप, सोनाक्षी सिन्हा, सोनम वांगचूक, रवीश कुमार सामील आहेत. सोशल मीडिया विश्लेषक याची तुलना अलिकडेच उदयास आलेल्या कॉकरोच जनता पार्टीशी करत आहे.
Comments are closed.