कामोठ्यात उभारणार सर्वात मोठे अग्निशमन केंद्र; ७ हजार चौरस मीटर भूखंड, २८ कोटींची तरतूद

नवी मुंबई आणि पनवेल शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन कामोठ्यात सर्वात मोठे अग्निशमन केंद्र उभारण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. पनवेल महापालि केच्या ७ हजार चौरस मीटर भूखंडावर हे हायटेक अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार असून त्यासाठी २८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. केंद्राच्या आराखड्यानुसार लागणाऱ्या खर्चाला महापालि का प्रशासनाने मंजुरी दिली असून त्याबाबतची निविदा प्रक्रिया पार पडताच भव्य अग्निशमन केंद्राच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे.

पनवेल महापालिका क्षेत्राला सर्वात मोठे अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी सिडको मंडळाकडून मोक्याचा भूखंड मिळण्यासाठी पनवेल महापालिकेकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार कामोठ्यातील मानसरोवर रेल्वे स्थानकासमोर असलेला ७ हजार चौरस मीटरचा भूखंड महापालिकेने सिडकोच्या ताब्यात दिल 1 आहे. नवी मुंबई विमानतळापासून ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या या केंद्रात नवी मुंबई, सिडको मंडळ आणि पनवेल महापालिकेचे संयुक्त नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहे. केंद्रात आपत्ती व्यवस्थापनासह तीनही यंत्रणांचे अग्निशमन अधिकारी एकत्रीतपणे शहरावर लक्ष ठेवणार आहेत. अग्निशमन दलाचे केंद्र सुरू झाल्यानंतर तेथे दोन हायटेक अग्निबंब आणि ४० जवान तैनात करण्यात येणार आहेत.

तीन नवे अग्निबंब खरेदी करणार
पनवेल महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या सेवेत १६ अग्निशमन बंब आणि १५८ अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. कामोठे येथील हायटेक केंद्र सुरू झाल्यानंतर त्यात आणखी ४० ते ५० कर्मचाऱ्यांची भर पडणार आहे. पनवेल महापालिकेकडे सातव्या मजल्यापर्यंत पाण्याचा मारा करणारा बंब उपलब्ध असून सिडको मंडळ व नवी मुंबई महापालिकेकडे २२ मजल्यापर्यंत पाणी पोहोचू शकेल, अशी यंत्रणा उपलब्ध आहे. दरम्यान वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने आणखी तीन नवे अग्निबंब खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Comments are closed.