शेवटच्या वेळी चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये कोणी मारली होती बाजी? भारत कितव्या स्थानी राहिला?

सुमारे अडीच दशकांपूर्वी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (ICC Champions Trophy) सुरू झाली. 1998 मध्ये ही स्पर्धा सुरू झाल्यापासून आतापर्यंत आयसीसीने एकूण 8 वेळा चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकणारा संघ ऑस्ट्रेलिया आहे. ऑस्ट्रेलियाने दोनदा ट्रॉफी जिंकली आहे. भारत देखील 2 वेळा चॅम्पियन आहे, परंतु, 2002 मध्ये श्रीलंकेसोबत ट्रॉफी शेअर करावी लागली होती. तत्पूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सुरू होण्यापूर्वी जाणून घेऊया की, शेवटच्या वेळी कोणत्या संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि भारताला कोणते स्थान मिळाले?

चॅम्पियन्स ट्रॉफीचे शेवटचे आयोजन 2017 मध्ये करण्यात आले होते, जे इंग्लंड आणि वेल्स यांनी संयुक्तपणे आयोजित केले होते. या स्पर्धेत जगातील टॉप-8 संघ सहभागी झाले होते, ज्यांची 2 गटांमध्ये विभागणी करण्यात आली होती. भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि बांगलादेश यांनी आपापल्या गटात पहिले 2 स्थान मिळवून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. पहिल्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानने इंग्लंडचा 8 गडी राखून पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारताने बांगलादेशचा 9 गडी राखून धुव्वा उडवला.

अखेर जेतेपदाच्या लढतीत भारत-पाकिस्तान हे 2 कट्टर प्रतिस्पर्धी आमने-सामने आले होते. फायनलमध्ये पाकिस्तानने प्रथम खेळताना 338 धावा केल्या. दरम्यान ‘फखर जमान’ने (Fakhar Zaman) 114 धावांची शानदार खेळी केली, तर ‘मोहम्मद हाफिज’ने (Mohammad Hafeez) 57 धावांची खेळी केली होती. प्रत्युत्तरात भारतीय संघ 158 धावांवर ढेपाळला.

भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज हार्दिक पांड्या (Hardik Pandya) होता. 76 धावांची शानदार खेळी खेळली होती. त्या चकमकीत पाकिस्तानचा स्टार खेळाडू मोहम्मद आमिर (Mohammed Amir) आणि हसन अली (Hasan Ali) यांनी पाकिस्तानचा धुव्वा उडवला. दोघांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या होत्या. त्यावेळी दिग्गज विराट कोहली (Virat Kohli) भारतीय संघाचा कर्णधार होता.

महत्त्वाच्या बातम्या-

INDW vs WIW; हरमनप्रीत कौरने रचला इतिहास, शानदार खेळीने विश्वविक्रम मोडला
IND vs ENG; भारत दौऱ्यासाठी इंग्लंड संघाची घोषणा…! ‘या’ स्टार खेळाडूचे पुनरागमन
Year Ender 2024; मराठी पाऊल पडते पुढे! स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राला दुसरे पदक मिळवून दिले

Comments are closed.