IPL 2025 मध्ये हे तीन यष्टीरक्षक ठरणार का गेम चेंजर ? जाणून घ्या एका क्लिकवर
आयपीएल 2025 स्पर्धेची सुरुवात 22 मार्चपासून होणार आहे. आयपीएल स्पर्धेतील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर या संघात कोलकत्ताच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळला जाणार आहे. आयपीएल 2025 स्पर्धेत तीन असे यष्टीरक्षक असणार आहेत, जे बॅट आणि ग्लव्सच्या मदतीने प्रभावी कामगिरी करू शकतात. हे तीन यष्टीरक्षक फक्त विकेट कीपिंग करणार नाही, तर त्यांच्या फलंदाजीने सामन्याची स्थिती बदलू शकतात. चला तर जाणून घेऊया की कोणते तीन यष्टीरक्षक 2025 आयपीएल स्पर्धेत बॅट आणि ग्लव्सच्या द्वारे कमाल करू शकतात.
ईशान किशन
ईशान किशन आयपीएल 2025 स्पर्धेत स्टार यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन यावर सगळ्यांच्या नजरा असणार आहेत. आयपीएलच्या मेगा लीलावात सनरायझर्स हैदराबाद ने ईशान किशनला 11.25 करोड रुपयांना खरेदी केले होते. ईशान किशन एक स्टार फलंदाजासोबत माहीर असा यष्टीरक्षक सुद्धा आहे. तसेच ईशान किशन या हंगामात सनरायझर्स हैदराबाद या संघात खेळताना दिसणार आहे. सनरायझर्स हैदराबादसाठी या हंगामात ईशान किशन आणि अभिषेक शर्मा यांची जोडी सलामीवीर म्हणून खेळताना दिसण्याची शक्यता आहे. ईशान किशनने 105 आयपीएल सामन्यात 28.44 सरासरीने 2664 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 16 अर्धशतकांचा समावेश आहे. ईशान किशनने आयपीएल करिअरमध्ये 51 कॅच पकडले आहेत.
क्विंटन डिकॉक
क्विंटन डिकॉक टी20 क्रिकेट मधील सर्वात घातक फलंदाजांमध्ये एक आहे. क्विंटन डिकॉक सलामीवीर फलंदाज शिवाय एक चालाख यष्टीरक्षक सुद्धा आहे. क्विंटन डिकॉक आयपीएल 2025 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. केकेआर संघाने डिकॉकला 3.60 करोड रुपयांना खरेदी केले होते.क्विंटन डिकॉक आयपीएल 2025 मध्ये कोलकत्ता नाईट रायडर्स संघासाठी सुनील नरेन सोबत डावाची सुरुवात करताना दिसू शकतो. डिकॉकने 107 आयपीएल सामन्यात 31.25 च्या सरासरीने 3157 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 2 शतक आणि 23 अर्धशतक सामील आहेत. क्विंटन डिकॉकने आयपीएल करिअरमध्ये विकेट कीपिंग मध्ये 67 कॅच पकडले आहेत.
जोस बटलर
जॉस बटलरला टी20 क्रिकेट मधल्या जबरदस्त फलंदाजांमध्ये पाहिले जाते. जॉस बटलर ओपनिंग आणि मिडल ऑर्डर दोन्ही स्थितीत फलंदाजी करू शकतो. तसेच तो एक शानदार यष्टीरक्षक सुद्धा आहे. जॉस बटलर आयपीएल 2025 स्पर्धेत गुजरात टायटन्स संघासाठी खेळताना दिसून येईल.जॉस बटलरला मेगा लिलावात गुजरात टायटन्सने 15.75 करोड रुपयांना खरेदी केले होते. याआधी राजस्थान रॉयल्सकडे तो खेळत होता. जॉस बटलर आयपीएल स्पर्धेत गुजरात संघाकडून शुबमन गिल सोबत डावाची सुरुवात करताना दिसून येईल. बटलरने 107 आयपीएल सामन्यात 38.10 च्या सरासरीने 3582 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 7 शतक आणि 19 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच विकेटकीपिंग मधून 55 कॅच त्याने पकडले आहेत.
Comments are closed.