या हंगामात माहीचा मास्टरस्ट्रोक, नवी बॅट करणार कमाल!

मागच्या आठवड्यापूर्वी आगामी इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या वर्षीच्या हंगामाला 22 मार्च पासून सुरुवात होणार आहे. तसेच या हंगामाचा अंतिम सामना 25 मे रोजी खेळला जाणार आहे. तत्पूर्वी चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी त्याच्या बॅट मध्ये मोठा बदल करण्याची शक्यता आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या म्हणण्यानुसार महेंद्र सिंग धोनी त्याच्या बॅटचे वजन कमी करणार आहे. आतापर्यंत धोनीला जड बॅट वापरण्यासाठी ओळखण्यात येत होते. पण या हंगामात तो बॅट मध्ये बदल करणार आहे.

अस सांगण्यात येत आहे की, महेंद्र सिंग धोनी त्याच्या 19 वर्षाखालील क्रिकेटच्या दिवसात तब्बल 1200 ग्रॅम वजनाची बॅट वापरत होता. त्यानंतर तो 1300 ग्रॅम वजनाची बॅट वापरायचा. आता मीडिया रिपोर्टनुसार मागच्या काही दिवसात धोनीच्या घरी 5 बॅट पोहोचवण्यात आल्या. या बॅट मेरठ येथे बनवण्यात आल्या आहेत. याआधी मागच्या दिवसांतील भारत पाकिस्तान सामन्या दरम्यान महेंद्र सिंग धोनीचा साथीदार माजी खेळाडू सुरेश रैनाने सांगितले की, महेंद्र सिंग धोनी त्याच्या बॅटवर काम करत आहे. तसेच आता हा प्रश्न उपस्थित होत आहे की,धोनी चेन्नई सुपर किंग्सच्या कॅम्पमध्ये कधी सामील होणार?

मीडिया रिपोर्ट्सच्या अंदाजानुसार महेंद्र सिंग धोनीने तो सुपर किंग्सच्या कॅम्पमध्ये कधी सामील होईल याची तारीख अजून जाहीर केली नाही. तो कधी कॅम्पमध्ये सामील होणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. तसेच ही गोष्ट समोर आली होती की, फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तो कॅम्पमध्ये सामील होणार आहे. त्याचबरोबर आयपीएलच्या इतिहासातील सगळ्यात यशस्वी कर्णधारांपैकी धोनी एक आहे. चेन्नई सुपर किंग्सने धोनीच्या नेतृत्वाखाली 5 वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे.

हेही वाचा

‘भारताला प्रवासाचा थकवा नाही, त्यामुळे त्यांना स्पर्धेत मोठा फायदा’- पॅट कमिन्स

न्यूझीलंडचा वादळी खेळ! चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतकांचा पाऊस

वनडे क्रिकेटमध्ये मी विराट कोहलीपेक्षा चांगला खेळाडू पाहिला नाही… ऑस्ट्रेलियाच्या महान कर्णधाराचा दावा

Comments are closed.