Beed News – बीडच्या कपिलधार धबधब्याचे आक्राळ विक्राळ रूप

बीड शहरापासून काही किलोमीटर अंतरावर मांजरसुबा घाटा लगत असणार्या तीर्थ क्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र कपिल धार च्या धबधब्याने शनिवारी झालेल्या पावसात रौद्र रूप धारण केले. दोन्ही धबधब्यातून पाणी अत्यंत तिव्रतेने कोसळत आहे.
बीड शहरापासून जवळच असलेल्या कपिलधार हे क्षेत्र मराठवाड्यात प्रसिद्ध श्री क्षेत्र आहे, कपिलधार येथे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले मन्मथ स्वामी यांची समाधी आहे. अगदी या समाधीस्थळा जवळच डोंगर कड्यातून दोन धबधबे कोसळत असतात. पावसाळ्यात या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी मराठवाड्यातून पर्यटक कपिलधार येथे आवर्जून येत असतात, अत्यंत निसर्गरम्य वातावरण असलेले हे क्षेत्र गेल्या आठवडा भरापासून पर्यटकांसाठी दुर्लक्षित झाले आहे, कारण पावसाचा जोर वाढत असल्याने पर्यटकांची पाऊले मंदावली आहेत, जोरदार पावसामुळे कपिलधारचे निसर्गरम्य धबधब्याचे ठिकाण आता अक्राळ विक्राळ रूपात समोर येत आहे. भयभीत करणारे पाण्याचे लोट अन् धबधब्याचे रौद्र रूप सध्या दिसत आहे.
Comments are closed.