आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजार तेजीसह बंद झाला.

सेन्सेक्स 187 अंकांनी तेजीत : आयटी निर्देशांकाची चमक

मुंबई :

सकाळच्या सत्रात असलेली दमदार तेजी गमावत भारतीय शेअरबाजार अखेर काहीशा तेजीसोबत बंद झाला. शुक्रवारी अखेरच्या सत्रात सेन्सेक्स 187 अंकांनी वाढत बंद झाला. शुक्रवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 187 अंकांनी वाढत 83570 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 29 अंकांनी वाढत 25694 अंकांवर बंद झाला. मिडकॅप निर्देशांक 97 अंकांनी वाढत 59868 अंकांवर तर स्मॉलकॅप निर्देशांक 49 अंक घसरत 17362 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांक 515 अंकांनी वाढत 60095 अंकांवर बंद झाला होता.

क्षेत्राच्या निर्देशांकांची कामगिरी

रियल्टी, तेल व गॅस निर्देशांक, फायनॅन्शीयल्स, आयटी व बँकिंग समभागांनी शुक्रवारी मजबूत कामगिरी केली होती. फार्मा, मेटल, ऑटो समभागांमध्ये शुक्रवारी दबाव पाहायला मिळाला. याव्यतिरीक्त एनर्जी, एफएमसीजी यांचे निर्देशांक घसरणीत असलेले दिसले. फार्मा 288 अंकांनी घसरत 22217 अंकांवर तर एनर्जी 276 अंकांनी घसरत 34346 अंकांवर बंद झाला. आयटी निर्देशांक 1264 अंकांनी चढत 39086 च्या स्तरावर बंद झाला होता.

समभागांची कामगिरी

शुक्रवारी शेअरबाजारात इन्फोसिस, टेक महिंद्रा, विप्रो, एचसीएल टेक, टाटा कंझ्युमर व श्रीराम फायनान्स यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. यासोबत टाटा मोटर्स पीव्ही, एसबीआय लाइफ, महिंद्रा आणि महिंद्रा, एचयुएल, मॅक्स हेल्थकेअर, इंडिगो, जेएसडब्ल्यू स्टील, टीसीएस, बजाज फायनान्स, ग्रासिम यांचे समभागही तेजी दाखवत बंद झाले.

तर दुसरीकडे निराशादायक कामगिरी करणाऱ्यांमध्ये इटर्नल, जियो फायनॅन्शीयल्स, सिप्ला, हिंडाल्को, एशियन पेंटस्, सन फार्मा, रिलायन्स, भारती एअरटेल, कोल इंडिया, मारुती सुझुकी, एनटीपीसी, ट्रेंट, बजाज ऑटो, टायटन, एचडीएफसी लाइफ, बीईएल, डॉ. रे•िज लॅब्ज, अदानी पोर्टस यांचे समभाग होते. मिडकॅपमध्ये फेडरल बँक, कोफोर्ज यांचे समभाग मजबूतीसोबत बंद झाले.

Comments are closed.