आशिया कपच्या सामन्यांच्या वेळेत बदल, आता या वेळेला सुरू होतील सामने
आशिया कप 2025 ची सुरुवात 9 सप्टेंबरपासून होत आहे. यंदा आशिया कप 2025 मध्ये तब्बल 8 संघ सहभागी होणार आहेत. सर्व संघांना दोन गटांमध्ये विभागण्यात आले आहे. या स्पर्धेचं यजमानपद यूएईकडे आहे. जवळजवळ सर्व देशांनी आपला संघ जाहीर केला आहे. या मेगा इव्हेंटला सुरुवात होण्यासाठी आता अवघे 10 दिवस शिल्लक आहेत. त्याआधी आशिया कपसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.
आशिया कपमधील सर्व सामन्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. न्यूज 24 चे वरिष्ठ क्रीडा पत्रकार वैभव भोला यांच्या माहितीनुसार, संयुक्त अरब अमिरातमध्ये तीव्र उष्णतेमुळे सामने भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होतील. भारतीय संघ आपला आशिया कपमधील मोहिमेचा शुभारंभ 10 सप्टेंबर रोजी करणार असून पहिल्या सामन्यात त्यांचा सामना यूएईशी होणार आहे.
आशिया कप साठी भारतीय संघ:
सूरकुमार यादव (कर्नाधर), शुबमन गिल (उपशार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, कुल्दीप यादव, अक्षर पटेल, जितेश शर्मा, अरशरत सिंह
Comments are closed.