Waterfall : जगातील सर्वात सुंदर धबधबे, उंची पाहून व्हाल थक्क

पावसाळा सुरू झाला की, सर्वांनाच पावसात भिजण्याचा मोह होतो. त्यामुळे पावसाळ्यात कित्येकजणांचे फिरायला जायचे प्लॅन सुरु होतात. विशेष करून फिरण्यासाठी पावसाची ठिकाणे पाहिली जातात. त्यातही धबधबा ही पहिली पसंती दिसून येते. धबधबा दिसताच मन हरखून जातं. डोंगरदऱ्यातून वाहणाऱ्या या धबधब्यांचे पावसाळ्यात तर सौंदर्य आणखीनच वाढते. आपल्या महाराष्ट्रात तर असे कितीतरी धबधबे आहेत, ज्यांचे सौंदर्य अप्रतिम आहे. खूप दूरदूरवरून निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी आणि उंचच उंच धबधबे पाहण्यासाठी येतात. त्यामुळे आज आपण असे धबधबे जाणून घेऊयात, जे जगातील सर्वात सुंदर धबधबे आहेत शिवाय त्यांची उंची पाहून अवाक् व्हायला होते.

एंजेल फॉल्स –

व्हेनझुएलाच्या कॅनाइमा राष्ट्रीय उद्यानात स्थित असेलेल्या एंजल फॉल्सची उंची 2648 फूट इतकी आहे. पावसाळ्यात या धबधब्याचे सौंदर्य आणखीनच वाढते.

तुगेला धबधबा –

तुगेला धबधबा हा 3110 फूट उंचीवरून पडतो, जो ड्रेकेन्सबर्ग पर्वतांमध्ये आहे. तुगेला धबधबा हा आफ्रिकेतील सर्वात उंच धबधबा आहे.

ट्रेस हरमानस धबधबा –

ट्रेस हरमानस धबधबा वेगवेगळ्या टप्प्यांमधून पडत असल्याने त्याला ‘थ्री सिस्टर्स’ असे नाव देण्यात आले आहे. हा धबधबा 2999 फूट उंचीवरून पडतो.

ओलोउपेना फॉल्स –

ओलोउपेना फॉल्स जवळपास 2953 फूट उंचीवरून पडतो. हा धबधबा हवाईमधील मोलोकाई बेटावर आहे.

युम्बिला धबधबा –

पेरूमधील हा धबधबा 3938 फूट उंचीवरून पडतो, जो अमेझॉनच्या घनदाट जंगलात आहे.

पुका ओकु फॉल्स –

पुउका ओकू फॉल्स 2756 फूट उंचीवरून पडतो. हा धबधबा हवाईमधील मोलोकाई बेटावर आहे.

बालाफोसेन फॉल्स –

बालाफोसेन फॉल्स जवळपास 2789 फूट उंचीवरून पडतो. वसंत ऋतूमध्ये या धबधब्याचे सौंदर्य नजरेला खिळवून ठेवणारे असते.

विनुफोसेन धबधबा –

2822 फूट उंचीवरून पडणार युरोपमधील सर्वात मोठा आणि उंच धबधबा आहे.

 

 

 

 

हेही पाहा –

Comments are closed.