IND vs ENG: सिक्सर किंग पंतचा विक्रम! अशी कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये भारतीय फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. केएल राहुल (KL Rahul), यशस्वी जयस्वाल (Yashsvi jaiswal) , शुबमन गिल (Shubman gill) आणि रिषभ पंत (Rishbh Pant) सातत्याने धावा करत आहे. त्यातही यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत आक्रमक शैलीत फटकेबाजी करत धावांचा पाऊस पाडत आहे. बर्मिंघम कसोटीच्या दुसऱ्या डावात शानदार अर्धशतक झळकावून पंतने इतिहास रचला आहे आणि त्याने ही कामगिरी करून अशी गोष्ट केली जी आजवर कोणताही फलंदाज करू शकलेला नाही.

बर्मिंघम कसोटीच्या दुसऱ्या डावात पंतने केवळ 58 चेंडूत 65 धावा केल्या. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 3 षटकार झळकावले. यासह रिषभ पंतने (Rishbh Pant) केवळ 45 कसोटीत 86 षटकार पूर्ण केले. महेंद्रसिंग धोनीला (MS Dhoni) मागे टाकत आता तो फक्त रोहित शर्मा (Rohit Sharma) 88 षटकार आणि वीरेंद्र सेहवाग (Virendra sehwag) 90 षटकार यांच्या मागे आहे. हे दोन्ही विक्रमही पंत ह्या मालिकेत मोडू शकतो.

त्याचबरोबर, इंग्लंडमध्येच पंतने 23 षटकार पूर्ण केले आहेत. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात परदेशी मैदानावर सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज म्हणून पंतने नवा विक्रम केला आहे. पंतने इंग्लंडमध्ये आतापर्यंत तीन दौरे केले असून प्रत्येकवेळी त्याने दमदार फलंदाजी करत धावा केल्या आहेत.

लीड्स कसोटीत पंतने पहिल्या डावात 134 तर दुसऱ्या डावात 118 धावा केल्या होत्या. बर्मिंघम कसोटीच्या पहिल्या डावातही त्याने आक्रमक फलंदाजी करत 25 धावा केल्या. दोन्ही डावात तो आक्रमक खेळ करताना बाद झाला, पण त्याच्या ह्या शैलीने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केले आहे.

Comments are closed.