वर्ल्डकप मधून बाहेर पडताच न्युझीलंडला मोठा धक्का! कर्णधार सोफी डिवाइनची वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
महिला विश्व कप 2025 स्पर्धेचा (ICC womens world cup 2025) 27वा सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड (NZW vs ENGW) यांच्या मध्ये खेळला गेला होता. या सामन्यात इंग्लंडने जबरदस्त कामगिरी करत 8 विकेट्सने सामना जिंकला. या पराभवानंतर न्यूझीलंडला मोठा धक्का बसला, कारण कीवी संघाच्या कर्णधार सोफी डिवाइनने (Sophie Divaine) वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. सोफी डिवाइनला इंग्लंडच्या खेळाडूंनी गॉड ऑफ ऑनर दिला, ज्याचे फोटो सोशल मिडियावरही व्हायरल होत आहेत.
न्यूझीलंडचा महिला वनडे विश्व कप 2025 मधील प्रवास संपला आहे. सोफी डिवाइनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने अपेक्षित कामगिरी केली नाही. संघ सेमीफायनलमध्ये पोहोचू शकला नाही. नॉकआउट सामन्यात टीम इंडियाच्या विरोधात न्यूझीलंडला पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने एकूण 7 सामन्यात फक्त 1 जिंकला, 4 सामन्यात पराभव पत्करला आणि 2 सामने पावसामुळे रद्द झाले.
36 वर्षांच्या सोफीने न्यूझीलंडसाठी 159 सामन्यात खेळ केला आहे. तिने 32.66 च्या सरासरीने 4279 धावा केल्या आहेत. तिच्या कारकिर्दीत 9 शतकांसह 18 अर्धशतक आहेत.
याशिवाय 146 टी-20 सामन्यात तिने 28.12 च्या सरासरीने 3441 धावा केल्या आहेत. यात तिच्या 1 शतक आणि 21 अर्धशतकांचा समावेश आहे. तर गोलंदाजीमध्येही तिने खास कामगिरी केली आहे. वनडे मध्ये 111 आणि टी-20 मध्ये 119 विकेट्स तिने मिळवल्या आहेत.
Comments are closed.