एका इंजिनमध्ये बिघाड झाल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

सर्व 335 प्रवासी सुखरुप

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे उ•ाण केल्यानंतर एक इंजिन बंद पडल्यामुळे अवघ्या 40 मिनिटांनी आपत्कालीन लँडिंग करावे लागले. वृत्तानुसार, बोईंग 777-300ईआर एआय887 विमानाचे उजवे इंजिन टेकऑफनंतर निकामी झाले. त्यानंतर आपत्कालीन परिस्थिती विचारात घेत विमान पुन्हा दिल्ली विमानतळावर आणावे लागले. विमान उ•ाणानंतर जवळपास एक तास हवेत होते. याप्रसंगी विमानात सुमारे 335 प्रवासी होते. सर्व प्रवाशांना पर्यायी विमानाने मुंबईला पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली.

एआय 887 या विमानाने सकाळी 6:10 वाजता उ•ाण केल्यानंतर सकाळी 6:52 वाजता ते माघारी परतले. दोन इंजिन असलेली विमाने केवळ एका इंजिनसह सुरक्षितपणे उतरू शकतात. मात्र, प्रसंगानुरूप योग्य निर्णय घेऊन आपत्कालीन लँडिंग करावे लागते. आता घडलेल्या या घटनेबाबत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने एअर इंडियाकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. तसेच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्रालयाने प्रवाशांना सर्वतोपरी मदत करण्याचे आणि पुढील उ•ाणांमध्ये त्यांना सामावून घेण्याचे निर्देश एअरलाइनला दिले होते.

Comments are closed.