भारतीय नसलेला खेळाडू वैभव सूर्यवंशीचा आदर्श! त्याचं नाव आणि देश ऐकून थक्क व्हाल
14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा जन्म आयपीएल स्पर्धा सुरू झाल्यानंतर तीन वर्षानंतर झाला होता. या युवा खेळाडूने आयपीएल 2025 मध्ये तो कारनामा केला आहे जो विराट कोहली, एम एस धोनी किंवा रोहित शर्मा असे दिग्गज वर्षांपासून करू शकले नाहीत. तो स्पर्धेमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावणारा दुसरा आणि पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
वैभव सूर्यवंशीचा आदर्श खेळाडू कोण आहे जर तुम्ही याचा अंदाज लावला तर विराट कोहली, धोनी, रोहित शर्मा ही नाव समोर असतील. जेव्हा वैभव क्रिकेट शिकत असेल तेव्हाही या दिग्गज खेळाडूंची देशभरात त्यांची कीर्ती पसरली होती. तुम्ही सचिन तेंडुलकरचा सुद्धा विचार करू शकता पण असं काहीच नाही. त्याचा आदर्श क्रिकेटर कोणताही भारतीय खेळाडू नाही तर वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा आहे.
वैभव सूर्यवंशीने 2024 अंडर-19 आशिया कप दरम्यान सोनी स्पोर्ट्स नेटवर्कशी बोलताना म्हटले की, त्याचा आदर्श खेळाडू ब्रायन लारा आहे. जो त्याच्या सारखाच उजव्या हाताचा फलंदाज आहे.
तो म्हणाला, मी सध्या माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करत आहे, माझ्या आजुबाजूला काय घडत आहे, त्यामुळे मी हैराण नाही. मला आधी आशिया कप वर लक्ष्य केंद्रित करायचे आहे. त्यानंतर पुन्हा एक एक सामन्यावर लक्ष केंद्रित करेल.
ब्रायन लारा माझा आदर्श खेळाडू आहे,मी त्याच्याप्रमाणे खेळण्याचा प्रयत्न करतो. तसेच मी माझ्या कौशल्याप्रमाणे खेळण्याचा प्रयत्न करत आहे. यावर मला काम देखील करायचे आहे.
ब्रायन लाराने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2008 मध्ये खेळला होता. त्यांनतर 3 वर्षांनी वैभव सूर्यवंशीचा जन्म झाला होता.
Comments are closed.