ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष फेब्रुवारीमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहेत.

लुला यांची मोदींशी दूरध्वनीवर चर्चा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

बदलत्या जागतिक घडामोडींदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे राष्ट्रपती लुला दा सिल्वा यांनी गुरुवारी फोनवरून चर्चा केली. या संभाषणादरम्यान, दोन्ही नेत्यांनी समान आव्हानांना तोंड देण्यासाठी त्यांच्या देशांच्या भूमिकेवर चर्चा केली. ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी फेब्रुवारीमध्ये भारताला भेट देण्याची घोषणा केली आहे. त्यांचा दौरा 19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान अपेक्षित आहे. दोन्ही नेत्यांनी सुधारित बहुपक्षीयतेचे महत्त्वही अधोरेखित केले. दक्षिण अमेरिकन देश ब्राझीलशी भारताचे द्विपक्षीय संबंध अलिकडच्या काळात लक्षणीयरीत्या मजबूत झाले आहेत.

लुला दा सिल्वा यांच्याशी झालेल्या संभाषणात पंतप्रधान मोदींनी जागतिक दक्षिणेचे सामायिक हितसंबंध पुढे नेण्यासाठी जवळच्या सहकार्याची गरज अधोरेखित केली. पंतप्रधानांनी ब्राझीलच्या राष्ट्रपतींचे लवकरच भारतात स्वागत करण्याची उत्सुकता देखील व्यक्त केली. एका अधिकृत निवेदनानुसार, मोदी आणि ब्राझीलच्या राष्ट्रपतींमध्ये झालेल्या फोनवरून झालेल्या संभाषणादरम्यान, दोन्ही नेत्यांनी सामायिक आव्हानांना तोंड देण्यासाठी सुधारित बहुपक्षीयतेचे महत्त्व अधोरेखित केले.

पंतप्रधान मोदी यांनी लूला यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती सोशल मीडियाद्वारे सर्वदूर केली. ‘राष्ट्रपती लूला यांच्याशी बोलून आनंद झाला. आम्ही भारत-ब्राझील धोरणात्मक भागीदारीतील प्रगतीचा आढावा घेतला. आता आम्ही नजिकच्या काळात द्विपक्षीय संबंधांमध्ये नवीन उंची गाठण्यासाठी सज्ज आहोत’, असे एक्स वरील पोस्टमध्ये मोदी म्हणाले.

जागतिक मुद्यांवरही विचारांची देवाणघेवाण

दोन्ही नेत्यांनी जागतिक महत्त्वाच्या मुद्यांवरही चर्चा केली. ‘ग्लोबल साउथच्या सामायिक हितांना पुढे नेण्यासाठी आमचे जवळचे सहकार्य महत्त्वाचे आहे. मी लवकरच त्यांचे भारतात स्वागत करण्यास उत्सुक आहे.’ असे मोदींनी म्हटले आहे. दोन्ही नेत्यांनी भारत-ब्राझील धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी आणि येत्या वर्षात ती आणखी उंचीवर नेण्यासाठी त्यांच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. तसेच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवरही विचारांची देवाणघेवाण केली. सामायिक आव्हानांना तोंड देण्यासाठी सुधारणावादी बहुपक्षीयतेचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

Comments are closed.