ओव्हलमध्ये WTC गुण गमावण्याची चेतावणी मिळाल्यानंतर, गौतम गंभीरच्या ‘या’ निर्णयाने संघाला मिळवून दिला विजय!

ओव्हल (IND vs ENG) 5 व्या कसोटी सामन्यामध्ये भारताने 6 धावांनी विजय मिळवला. मात्र, आता या सामन्याच्या अखेरच्या दिवशी घडलेली एक मोठी गोष्ट समोर आली आहे. दैनिक जागरणच्या रिपोर्टनुसार, ओव्हल कसोटीच्या पाचव्या दिवशी सकाळी जेव्हा भारतीय संघ विजयाची रणनीती आखत होता, त्याच वेळी सामना निरीक्षक जेफ क्रो यांनी संघाला संदेश पाठवला की, भारत ओव्हलमध्ये ठरलेल्या वेळेपेक्षा 6 षटके मागे आहे. जर ही भरपाई करता आली नाही तर तुमचे 4 WTC गुण कमी केले जातील.

ही बाब समोर आल्यानंतर प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि कर्णधार शुबमन गिल (Shubman gill) यांनी खेळाडूंशी चर्चा केली. रिपोर्टनुसार, संघ बैठकीत एका सदस्याने सुचवले की, प्रसिद्ध कृष्णाच्या (Prasiddh Krishna) 4 चेंडूंपश्चात दोन्ही टोकांना रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि वॉशिंग्टन सुंदरला (Washington Sundar) गोलंदाजी द्यावी, जेणेकरून ओव्हर रेटची भरपाई होईल.

परंतु गौतम गंभीर यांनी मोठा निर्णय घेतला. त्यांनी ठरवले की WTC गुण कमी होण्याच्या भीतीने फिरकीपटूंना गोलंदाजी दिली जाणार नाही, कारण त्यावेळी क्रीजवर जेमी स्मिथ आणि जेमी ओव्हर्टन हे आक्रमक फलंदाज होते, जे फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर जलद धावा करून सामना संपवू शकले असते. त्यामुळे गंभीर यांनी गुण दावणीवर लावूनही वेगवान गोलंदाजांकडूनच गोलंदाजी चालू ठेवली. या निर्णयाला कर्णधार शुबमन गिल याचीही साथ मिळाली.

शेवटी, वेगवान गोलंदाजांनीच भारताला विजय मिळवून दिला. या कसोटीत भारताने 6 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. मोहम्मद सिराजने (Mohmmed Siraj) अप्रतिम गोलंदाजी करत 9 विकेट्स घेतल्या आणि भारताच्या विजयाची पायाभरणी केली. त्यासाठी त्याला सामनावीराचा किताब मिळाला.

Comments are closed.