ब्रेकअपचं टेन्शन नाही… आली ‘एआय’ गर्लफ्रेंड!
आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या जमान्यात काय होईल सांगता येत नाही. एआय कंपॅनियन टूल्सनंतर, एआय रोबोट ‘गर्लफ्रेंड’देखील तयार करण्यात आली आहे. तिचे सारे फीचर माणसासारखं आहेत. ‘आरिया’ ही रोबोट ‘गर्लफ्रेंड’ विशेषतः सहवास आणि जवळीकतेसाठी डिझाईन केलेली आहे. अमेरिकेच्या रियल बॉटिक्स कंपनीने एआय गर्लफ्रेंड बनवली आहे. आरियाच्या संपूर्ण शरीरात 17 मोटर्स बसविण्यात आल्या आहेत, ज्यामुळे तिला मान फिरवण्यास आणि इतर हालचाली करण्यास मदत होते.
कंपनीने आरियाचे तीन व्हर्जन आणले आहेत. आरियाचा चेहरा, केसांचा रंग आणि केशरचनादेखील कस्टमाईज करता येते. रोबोट्समध्ये आरएफआयडी टॅग्ज जोडलेले आहेत, ज्यामुळे तिने कोणता चेहरा धारण केला आहे याचा अंदाज लावू शकते. या आधारावर ती तिच्या हालचाली आणि व्यक्तिमत्त्वात बदल करते.
एका प्रकारात फक्त मानेचा वरचा भाग उपलब्ध असेल. यासाठी 10000 अमेरिकन डॉलर्स म्हणजेच अंदाजे 8 लाख 60 हजार रुपये खर्च करावे लागतील. दुसरे मॉड्युलर आवृत्ती आहे. त्याची किंमत 1 कोटी 29 लाख रुपये आहे, तर तिसरा पर्याय पूर्ण आकाराचे मॉडेल आहे, ज्याची किंमत 1 कोटी 50 लाख रुपये आहे.
Comments are closed.