मादक अदा, भुरळ पाडणारं हास्य आणि निखळ सौंदर्य पुन्हा एकदा पडद्यावर अवतरणार!

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मधुबाला या अभिनेत्रीने एक काळ गाजवला. मधुबालाला मोठ्या पडद्यावर पाहणे हा एक अनोखा आनंद होता. मधुबालाचं दिसणं आणि तिचं हसणं यावर फिदा असणारा प्रेक्षकवर्ग आजही तिच्या आठवणींमध्ये रममाण होतो. येत्या काही दिवसांमध्ये मधुबालावर एक जीवनपट येणार आहे. त्यामुळे मधुबालाचे चाहते सध्या खुश आहेत. संजय लीला भन्साळी निर्मित आगामी जीवनपटामध्ये अनित पड्डा ही दिग्गज अभिनेत्री मधुबालाची भूमिका साकारणार आहे.

वृत्तानुसार, मधुबालाच्या जीवनावर आणि कारकिर्दीवर आधारित या चित्रपटात आता अनितची वर्णी लागली आहे. जसमीत के. रीन हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. यामधील संबंधित कलाकार आणि इतर गोष्टींची माहिती ही अद्यापही गुलदस्त्यामध्ये आहेत. आतापर्यंत सोशल मीडियावर मधुबालाच्या आगामी बायोपिकबद्दल बातम्या आणि इतर गोष्टींविषयी चर्चा या मोठ्या प्रमाणावर होत आहेत. परंतु भन्साळी प्रोडक्शन कडून मात्र या वृत्ताबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. फिल्मफेअरने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटासाठी अनिता हीच मधुबालाची भूमिका वठवणार आहे. तसेच येत्या काही दिवसांमध्ये या चित्रपटाचे शूटींग सुरु होणार आहे.

काही दिवसांपूर्वी मधुबाला यांची भूमिका कियारा अडवाणी वठवणार असल्याचे, म्हटले जात होते. परंतु या वृत्तात मात्र कोणतेही तथ्य नव्हते. डार्लिंग्जचे दिग्दर्शक जसमीत के. रीन हे चित्रपट दिग्दर्शित करणार असून, इतर कलाकार कोण आहे हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. अनितचा पहिला चित्रपट हा सैयारा असून, तो तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला होता. आगामी मधुबालामध्ये अनितला पाहण्यास तिचे फॅन्स उत्सुक आहेत.

Comments are closed.