'स्काय' प्रणाली गोल्डन मंदिराची ढाल बनली

लष्कराकडून डेमो सादर : प्रतिहल्ल्यात पाकिस्तानकडून क्षेपणास्त्र-ड्रोनद्वारे मारा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पाकिस्तानने अमृतसरमधील सुवर्ण मंदिराला लक्ष्य करण्यासाठी क्षेपणास्त्रs आणि ड्रोन डागल्याची माहिती सोमवारी उघड करण्यात आली. पाकिस्तानी सैन्याने केलेल्या या हल्ल्यानंतर भारतीय संरक्षण यंत्रणेने सर्व क्षेपणास्त्रे व ड्रोन उद्ध्वस्त केले. लष्कराने याबाबत एक डेमो सादर केला आहे. याशिवाय, लष्कराच्या पश्चिम विभागाने एक नवीन व्हिडिओही जारी केला. व्हिडिओमध्ये लष्कराने पंजाबमध्ये पाडण्यात आलेल्या पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचे अवशेष देखील दाखवण्यात आले आहेत.

भारतीय लष्कराने सोमवारी एक प्रात्यक्षिक दाखवले. त्यात आकाश क्षेपणास्त्र प्रणालीसह भारतीय हवाई संरक्षण प्रणालींनी अमृतसरमधील सुवर्ण मंदिर आणि पंजाबमधील शहरांचे पाकिस्तानी क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांपासून कसे संरक्षण केले याचे वर्णन केले आहे. 15 इन्फंट्री डिव्हिजनचे जीओसी मेजर जनरल कार्तिक सी शेषाद्री यांनी यासंबंधी सविस्तर माहिती दिली. ‘पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये भारत आणि परदेशातील नि:शस्त्र पर्यटकांवर पद्धतशीरपणे हल्ला केल्याची जाणीव संपूर्ण जगाला आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संताप पसरल्यानंतर भारताच्या मजबूत नेतृत्वाखाली ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविण्यात आले. यादरम्यान आम्ही फक्त दहशतवाद्यांचे अ•s उद्ध्वस्त केले.  दहशतवाद्यांशिवाय इतर कोणालाही इजा झाली नाही. मात्र, पाकिस्तानने भारतावर प्रतिहल्ले करत धार्मिक ठिकाणे, सर्वसामान्य लोकांची घरे आणि लष्करी छावण्यांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला’, असे शेषाद्री म्हणाले.

7 मे च्या रात्री आम्हाला विश्वासार्ह माहिती मिळाली होती की, कोणतेही योग्य आणि अचूक लक्ष्य नसतानाही पाकिस्तान नागरी स्थळांना, विशेषत: धार्मिक स्थळांना लक्ष्य करेल. यापैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे अमृतसरमधील सुवर्ण मंदिराला सर्वाधिक धोका होता. पाकिस्तान मोठ्या संख्येने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी सुवर्ण मंदिरावर हल्ला करणार असल्याची पूर्वकल्पना असल्याने आम्ही ताबडतोब अतिरिक्त आधुनिक आणि योग्य हवाई संरक्षण व्यवस्था पुरवली. आम्ही सुवर्ण मंदिराची मुळीच हानी होऊ दिली नाही, असेही लष्कराकडून सांगण्यात आले.

पाकिस्तानने पुन्हा दहशतवाद्यांना मदत केली तर ते नक्कीच नेस्तनाबूत होतील. सद्यस्थितीत ऑपरेशन सिंदूर फक्त पुढे ढकलण्यात आले आहे, ते संपलेले नाही. त्याचे भयानक रूप अजून येणे बाकी आहे. भारतीय सैन्याने फक्त दहशतवादी आणि दहशतवाद्यांच्या अ•dयांवरच लक्ष केंद्रित केले. कोणतीही अन्य जीवितहानी न होता अचूकतेने हल्ले केले, असे जीओसी मेजर जनरल कार्तिक सी शेषाद्री यांनी सांगितले.

Comments are closed.