सर्वात बारीक कार

इंटरनेटवर एखादी अनोखी गोष्ट लवकरच लोकांना पसंत पडते आणि त्वरित व्हायरल होते. सध्या एका कारचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कारचा आकार अत्यंत अजब आहे. याला जगातील सर्वात स्लीम कार संबोधिले जात आहे. ही कार इटलीतील एका इसमाने तयार केली आहे. फिएट पांडा कारला पूर्णपणे बदलून त्याने याला अत्यंत पातळ कारमध्ये बदलले आहे.

कार इतकी स्लीम आहे की, यात केवळ एक इसम बसू शकतो. कारमध्ये चार चाकं असली तरीही त्यामधील अंतर इतके कमी आहे की कार अत्यंत अरुंद दिसून येते. पहिल्या नजरेत याला कुणी कारही मानणार नाही. व्हिडिओत संबंधित इसम ही कार रस्त्यावर सहजपणे चालविताना दिसून येतो.

या व्हिडिओवर लोकांनी कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी कारला पाहून आश्चर्य व्यक्त केले. मी याला बाइकप्रमाणे वेगाने वळविताना पाहू इच्छितो, असे एका युजरने म्हटले आहे. तर दुसऱ्या युजरने ही कार टूथपिकप्रमाणे दिसून येत असल्याची टिप्पणी केली. काही लोक याला उत्तम क्रिएटिव्हिटी मानत आहेत. तर काही जण याला बेकार प्रयोग ठरवत आहेत.

यापूर्वी जगातील सर्वात कमी उंचीच्या कारचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, यात चालकाला झोपून कार चालवावी लागत होती. या कारमध्ये सीट नव्हती, तसेच ती मोठ्या टायरवरूनही धावत नव्हती. ही कार रस्त्यावर सरपटत असल्यासारखी धावत होती.

 

Comments are closed.