राज्याची तिजोरी मुख्यमंत्र्यांच्या हातात, नाव न घेता रावसाहेब दानवेंचा अजित पवारांना टोला


रावसाहेब दानवे : राज्यातील 12 कोटी जनतेने ज्यांना मुख्यमंत्री बनवलं त्यांच्या हातात राज्याची तिजोरी असते असे मत भाजप नेते आणि माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले. एखादं धोरण ठरवायचं असेल तर मंत्रिमंडळात चर्चा होते, मोठी योजना जाहीर केली जाते. त्यामुळं एखाद्या योजनेचे श्रेय कोणत्याही एका माणसाला घेता येत नाही. राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री असतात आणि साऱ्या चाव्या मुख्यमंत्र्यांच्या हातात असतात असे म्हणत नाव न घेता दानवेंनी अजित पवारांना टोला लगावला.

नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपनं एकला चलोची भूमिका घेतल्याने, राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या भाजप आणि मित्रपक्षांमध्ये श्रेय-वादाची लढाई चांगलीच पेटली आहे. तिजोरीच्या चाव्या नेमक्या कोणाच्या हातात आहेत? आणि लाडकी बहीण योजना कोणाची? यावरून सत्ताधाऱ्यांमध्ये ठिणग्या उडतान दिसत आहे. यावर दानवेंनी सविस्तर प्रतिक्रिया दिली.

सामान्य जनतेला जवळचा पक्ष भारतीय जनता पक्ष वाटतो

भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनामांमध्ये लाडकी बहीण योजना लागू करु असा आश्वासन दिलं होतं. सर्व निवडणुकीमध्ये आम्ही नंबर एकचा पक्ष, त्यामुळे सामान्य जनतेला जवळचा पक्ष भारतीय जनता पक्ष वाटतो. लाडक्या बहिणीचा फायदा आम्हालाच मिळणार आहे याचबरोबर बाकीची विकास कामे आणि जनहिताच्या कामाचा देखील फायदा आम्हाला मिळणार असल्याचे मत दानवे यांनी व्यक्त केले. भाजप प्रदेशाध्य रवींद्र चव्हाण यांनी दोन तारखेपर्यंत युती टीकवायची असं वक्तव्य केलं होतं. यावर बोलताना दानव म्हणाले की, त्यांना वातावरण खराब होऊ द्यायचं नसेल म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की संयम ठेवा. दोन तारखे पर्यंत काही करू नका, नंतर बघू, बघू म्हणजे वेगळं काही करणे असे नाही असे दानवे म्हणाले.

कोणालाही कितीही लोकांना एकत्रित येऊ द्या ते आमचा मुकाबला करू शकत नाहीत

कुणालाही एकत्र येऊ द्या काही फरक पडणार नाही असे मत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर दानवेंनी व्यक्त केले. आमचे तीन पक्षाचे सरकार आहे, काही ठिकाणी आम्ही वेगळे लढतो आहोत, निवडणुकीनंतर आम्ही पुन्हा एकत्र येऊन या राज्यातील सत्ता महानगरपालिकेत जिल्हा परिषदेमध्ये  स्थापन करु. यांना कोणालाही कितीही लोकांना एकत्रित येऊ द्या ते आमचा मुकाबला करू शकत नाहीत असेही दानवे म्हणाले.

अब्दुल सत्तार यांच्यावर केली टीका

अब्दुल सत्तार यांच्या नात्यागोत्यातली आणि त्यांच्या समाजाचे रहिवासी आहेत त्यांच्या  सगळ्यांचे जावयांच्या मुलींचे नातेवाईक सिल्लोड मध्ये आणून भरल्याचे दानवे म्हणाले. ते खुद के गली में शेर बताते है, असा टोला देखील दानवेंनी सत्तारांना लगावला. सत्तारांनी जिल्ह्याबाहेरील बोगस नावे सिल्लोडमध्ये घातली आहेत. त्यामुळे नगरपालिकेमध्ये सुद्धा विधानसभा प्रमाणेच होईल असे मत दानवेंनी व्यक्त केले.

आणखी वाचा

Comments are closed.