The statement of the Minister of State for Home Yogesh Kadam was used in the defense of the accused in the Pune Sessions Court
पुणे – स्वागरेगट बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडे तीन दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. त्याच्या शोधासाठी पुणे पोलिसांचे 13 पथक तैनात करण्यात आले होते. डॉग स्कॉड, ड्रोनच्या मदतीने त्याचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी गुरुवार-शुक्रवारच्या मध्यरात्री आरोपी दत्तात्रय गाडेला अटक केले. त्याला आज पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील आणि आरोपीच्या वकिलांचा सत्र न्यायालयात युक्तीवाद झाला, त्यानंतर कोर्टाने आरोपीला 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पुण्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या स्वारगेट बस स्थानकात बुधवारी पहाटे 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार करण्यात आला होता. याप्रकरणी फरार असलेला दत्तात्रय गाडे अखेर त्याच्या गुनाट गावात सापडला. त्याला आज पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी आरोपीचे वकील वाजिद खान बीडकर यांनी खळबळजनक युक्तीवाद केला.
वकील वाजिद खान म्हणाले, आरोपीने तरुणीच्या सहमतीने शारीरिक संबंध ठेवले. ते वर्दळीच ठिकाण आहे. जर माझ्या क्लायंटने जबरदस्ती केली असती तर तरुणीकडून विरोध झाला असता, प्रतिकार केला असता. मात्र तसा कोणताही विरोध झालेला नाही. बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तरुणी शांतपणे बसमध्ये जाताना दिसत आहे. त्यामुळे दत्तात्रय गाडे आणि तरुणीच्या सहमतीने शारीरिक संबंध ठेवण्यात आले, असा युक्तीवाद आरोपीच्या वकिलांनी केला.
काय म्हणाले होते गृहराज्यमंत्री ?
विशेष म्हणजे राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही अशाच प्रकारचे वक्तव्य गुरुवारी केले. स्वारगेट बसस्थानकाला दिलेल्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना योगेश कदम म्हणाले होते की, “एखादा विकृत विचाराचा एक पुरुष तिथे महिलेला गोड बोलून तीन ते चार मिनिटे बोलून तिला जाळ्यात ओढले. मग काय घडले हे आता सर्वांसमोर आहे. पण, त्यावेळेस तिथे कोणतीही हाणामारी झालेली नाही, कोणताही वाद किंवा कोणताही प्रतिकार करण्यात आला नाही. जे काही घडलं ते अतिशय शांततेत घडले. त्यामुळे तिथे जे काही घडले ते जेव्हा आरोपी आपल्या ताब्यात येईल तेव्हाच कळेल.” असे वादग्रस्त विधान केले.
हेही वाचा : Uddhav Thackeray : कोकणातून पुन्हा एकदा ठाकरेंना धक्का; रामदास कदम, योगेश कदम यांची नवी जुळवाजुळव
विरोधकांकडून योगेश कदमांच्या वक्तव्याचा समाचार
योगेश कदम यांच्या या विधानानंतर विरोधी पक्षाने त्यांना धारेवर धरले शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी योगेश कदम यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, योगेश कदम यांना थोडी तरी लाज शरम आहे की नाही. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी गृहराज्यमंत्र्यांनी लाज शरम सोडली आहे. त्यांनी कमरेचेही सोडले आहे का? असा संतप्त सवाल केला. तर मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगेश कदम यांना काळजीपूर्वक वक्तव्य करण्याचा सल्ला दिला. योगेश कदम यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला. मात्र आज कोर्टात आरोपीच्या बचावात त्याच्या वकीलांकडून गृहराज्यमंत्र्यांनी केलेले विधानाच वापरण्यात आले. पीडितेने प्रतिकार का केला नाही, असा सवाल आरोपीच्या वकिलाने केला. दरम्यान आरोपी दत्तात्रय गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा : Pune Rape Case : स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी
Comments are closed.