भारत-इंग्लंड संघातील तिसरा वनडे सामना कधी आणि कुठे पाहायचा? जाणून घ्या एका क्लिकवर

भारत-इंग्लंड (India vs England) संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. त्यातील 2 सामने खेळले गेले आहेत. दरम्यान भारतीय संघाने दोन्ही सामन्यात शानदार विजय मिळवला. पण आता दोन्ही संघातील तिसरा आणि मालिकेतील शेवटचा सामना उद्या (12 फेब्रुवारी) रोजी खेळला जाणार आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघ 3-0ने मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात मैदानात उतरेल. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण जाणून घेऊया की, हा सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह पाहायचा?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा वनडे सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. दोन्ही संघातील तिसरा वनडे सामना बुधवार, (12 फेब्रुवारी) रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार, सामना दुपारी 1:30 वाजता सुरू होईल. टाॅस 1 वाजता होईल.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा वनडे सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कद्वारे टीव्हीवर थेट प्रक्षेपित केला जाईल. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टारद्वारे प्रक्षेपित केले जाईल.

भारत-इंग्लंड संघांच्या हेड-टू-हेड रेकाॅर्डबद्दल बोलायचे झाले, तर दोन्ही संघात आतापर्यंत एकूण 108 वनडे सामने खेळले गेले आहेत. भारतीय संघाने 59 सामने जिंकले आहेत, तर इंग्लंड संघाने 44 सामने जिंकले आहेत. याशिवाय 3 सामने अनिर्णीत राहिले आणि 2 सामने बरोबरीत सुटले.

वनडे मालिकेसाठी दोन्ही संघ-

भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती

इंग्लंड- जोस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस अ‍ॅटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल साल्ट आणि मार्क वूड

महत्त्वाच्या बातम्या-

Ranji Trophy; अजिंक्य रहाणेच्या दमदार शतकाने बीसीसीआयचे लक्ष वेधले
‘या’ स्टार खेळाडूमुळे गौतम गंभीरवर भडकला माजी दिग्गज! म्हणाला…
Champions Trophy: जसप्रीत बुमराहच्या खेळण्यावर आज होणार अंतिम निर्णय!

Comments are closed.