इंग्लंड 'आपल्याच पायावर कुऱ्हाड' मारणार? लॉर्ड्स कसोटीच्या खेळपट्टीबाबत धक्कादायक नियोजन समोर!

इंडिया वि इंग्लंड लॉर्ड्स टेस्ट: सध्या भारत विरूद्ध इंग्लंड संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. दरम्यान ही मालिका आता रोमांचक टप्प्यावर पोहोचली आहे. आता दोन्ही संघातील तिसरा कसोटी सामना लाॅर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळला जाणार आहे. पहिल्या कसोटीत बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने शानदार विजय मिळवला, तर दुसऱ्या कसोटीत शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दमदार पुनरागमन करत इंग्लंडला 336 धावांनी धूळ चारत इतिहास रचला. सध्या ही मालिका 1-1 अशा बरोबरीत आहे.

आता दोन्ही संघांमध्ये या मालिकेतील पुढील म्हणजेच तिसरा सामना 10 जुलैपासून लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाईल. एजबॅस्टन कसोटीतील पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने खेळपट्टीबद्दल विधान केले होते, ज्यात त्याने ही खेळपट्टी भारतीय संघासाठी अधिक अनुकूल असल्याचे म्हटले होते. आता लॉर्ड्समध्ये होणाऱ्या सामन्यासाठी इंग्लंड संघ खेळपट्टीबाबत मोठी योजना आखत आहे. (Lord’s pitch strategy)

लॉर्ड्सच्या मैदानावर गेल्या महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या पर्वाचा फायनल सामना खेळला गेला होता, ज्यात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले होते. आता, ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, इंग्लंड संघाचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमने एमसीसीचे मुख्य ग्राउंड्समन कार्ल मॅकडरमॉट यांच्याकडे लॉर्ड्सच्या खेळपट्टीवर थोडी अधिक गती आणि उसळी तसेच बाजूकडील हालचाल देण्याची मागणी केली आहे. (Brendon McCullum pitch request)

मॅक्युलमने एजबॅस्टन कसोटीतील पराभवानंतर म्हटले होते की, पुढील सामना रोमांचक होईल, परंतु त्यासाठी खेळपट्टीत थोडी ‘जान’ असली पाहिजे. तसेच, त्यांनी हे देखील स्पष्ट केले होते की, जोफ्रा आर्चर पुढील सामन्यासाठी निवडीसाठी पूर्णपणे उपलब्ध आहे. (Jofra Archer Lords Test availability)

भारतीय संघाने एजबॅस्टन कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, लॉर्ड्समध्ये त्याचे खेळणे निश्चित मानले जात आहे, ज्याबद्दल कर्णधार शुबमन गिलनेही आपल्या विधानाने आधीच पुष्टी केली आहे. भारतीय संघाने जेव्हा शेवटच्या वेळी लॉर्ड्सच्या मैदानावर कसोटी सामना खेळला होता, तेव्हा त्यांनी इंग्लंड संघाला हरवण्यात यश मिळवले होते. 2021 मध्ये झालेल्या या सामन्यात भारतीय संघाकडून केएल राहुलने बॅटने कमाल केली होती, तर गोलंदाजीत मोहम्मद सिराजने जादू दाखवली होती, ज्याने सामन्यात एकूण 8 विकेट्स घेतल्या होत्या. (KL Rahul Mohammed Siraj Lords 2021)

Comments are closed.