भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांचा थरार

93 व्या स्थापनादिनी राफेल, सुखोई, तेजसकडून लक्षवेधी हवाई प्रात्यक्षिके : ब्रह्मपुत्रा नदीवरील पट्ट्यात 75 विमानांचे उ•ाण

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, गुवाहाटी

भारतीय हवाई दलाच्या 93 व्या स्थापना दिनानिमित्त गुवाहाटी येथील नॉर्दर्न कमांड येथे पहिला एअर शो आयोजित करण्यात आला होता. ब्रह्मपुत्रा नदीवरील लचित घाटावर वायुदलाच्या हवाई योद्ध्यांनी 25 हून अधिक फॉर्मेशन तयार करत थरारक प्रात्यक्षिके सादर केली. राफेल, सुखोई आणि तेजससह 75 हून अधिक विमाने आणि हेलिकॉप्टरने उड्डाण करत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. यावर्षीच्या वायुदल दिनाची थीम ‘अचूक आणि अभेद्य’ अशी असून ती वायुदलाच्या ऑपरेशनल क्षमता, लवचिकता आणि अचूकतेवर लक्ष केंद्रित करण्याचे प्रतीक आहे.

भारतीय वायुदलाने रविवार, 9 नोव्हेंबर रोजी गुवाहाटीमध्ये सादर केलेल्या प्रात्यक्षिकांनी संपूर्ण देशाला अभिमानाने भारून टाकले. वायुदलाने 93 व्या वर्धापन दिनानिमित्त ब्रह्मपुत्र नदीवरील लचित घाटावर एक भव्य हवाई शो आयोजित केला. राफेल, सुखोई, तेजस आणि मिराज सारख्या लढाऊ विमानांनी एकत्रितपणे उ•ाण केले. याप्रसंगी संपूर्ण आकाश देशभक्तीच्या रंगांनी भरलेले दिसून आले.

हवाई शक्तीचा संदेश

आसाममधील गुवाहाटी हा प्रदेश चीन सीमेजवळ आणि चिकन्स नेक कॉरिडॉरजवळ असल्याने हा शो धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. गुवाहाटीच्या भूमीवरून भारताने चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. राफेल आणि तेजस सारख्या लढाऊ विमानांचे या प्रदेशावरून उ•ाण ईशान्येकडील भारताच्या हवाई शक्तीच्या उपस्थितीचा एक मजबूत संदेश देते.

सात विमानतळांवरून उड्डाण

उड्डाण प्रदर्शनासाठी वायुसेनेतील योद्ध्यांनी गुवाहाटी, तेजपूर, जोरहाट, चाबुआ, हासीमारा, बागडोगरा आणि पानागढ येथून उ•ाण केले. या खास प्रसंगी हवाई दलाच्या आधुनिक विमानांनी आणि हेलिकॉप्टरनी 25 वेगवेगळ्या स्वरूपात उ•ाण केले. यामध्ये राफेल, सुखोई-30एमकेआय, तेजस, मिराज, जग्वार, मिग-29, सी-130, सी-17, अपाचे, प्रचंड आणि एएलएच मार्क-1 हेलिकॉप्टरचा समावेश होता. तसेच सूर्यकिरण एरोबॅटिक टीमने एअर शोमध्ये नेत्रदीपक प्रदर्शन केले.

ईशान्येकडील लोकांचे लक्षणीय प्रतिनिधित्व

एअर शोच्या निमित्ताने पूर्वेकडील हवाई कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (एओसी-इन-सी) एअर मार्शल सुरत सिंग यांनी महत्त्वाचे भाष्य केले. आम्ही यंदाच्या एअर शोसाठी ईशान्येकडील प्रदेश निवडण्यामागे विशेष कारण असल्याचे सांगितले. सुरक्षा दलामध्ये आता ईशान्येकडील प्रदेशातील लोकांचे लक्षणीय प्रतिनिधित्व असल्याचे ते म्हणाले. ईशान्येकडील लोकांशी संपर्क साधण्यासाठी भारतीय हवाई दलाचा हा प्रयत्न आहे. गुवाहाटी हे ईशान्येकडील प्रवेशद्वार आहे. भारतीय वायुदल ईशान्येकडील तयारी आणि ऑपरेशन्ससाठी पूर्णपणे सज्ज आहे. आम्ही सर्व संभाव्य परिस्थितींसाठी पूर्णपणे सज्ज आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तरुणांमध्ये नवीन ऊर्जा आणि प्रेरणा

या वायुदलाच्या हवाई शोने तरुणांमध्ये नवीन ऊर्जा आणि प्रेरणा भरली गेली. आता या भागातील तरुणही देशाच्या संरक्षणात योगदान देऊ शकतील. या एअर शोनंतर आता 13 ते 20 नोव्हेंबर दरम्यान भारत ईशान्येकडील राज्यात एक मोठा सराव करणार आहे. या प्रात्यक्षिकांसाठी लष्कर, नौदल आणि वायुदल सीमेवर देशाच्या विविध भागात संयुक्त ऑपरेशन्सचा सराव करत आहेत.

Comments are closed.