Asia Cup: आशिया कपचा थरार होणार कमी! या 4 खेळाडूंची जाणवणार का कमतरता?
एसीसी आशिया कप 2025 सुरू होण्यासाठी आता फक्त 1 दिवस बाकी आहे. मात्र या स्पर्धेतील सर्वात महत्वाचा सामना 14 सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान यांच्यात रंगणार आहे. या सामन्याची चाहत्यांना आतुरता आहे, पण तरीसुद्धा तिकीट खरेदीसाठी ते पुढे येत नाहीत. यामागे 4 सुपरस्टार खेळाडूंचे नाव घेतले जात आहे. या खेळाडूंनी भारत-पाकिस्तानच्या या महामुकाबल्याची रंगत फिकी केली असून त्यामुळे आयसीसीची चिंता वाढली आहे.
भारतीय संघाचा सुपरस्टार फलंदाज विराट कोहली पाकिस्तानविरुद्ध खेळून सामन्याची रंगत दुप्पट करतो.(Indian team’s superstar batsman Virat Kohli doubles the excitement of the match by playing against Pakistan) कोहलीने पाकविरुद्ध 11 सामन्यांत 70.29 च्या सरासरीने 492 धावा केल्या आहेत. या दरम्यान किंग कोहलीने 5 तडाखेबंद अर्धशतके ठोकली आहेत. पाकिस्तानविरुद्धची कोहलीची सर्वात संस्मरणीय खेळी टी20 विश्वचषक 2022 मध्ये मेलबर्नच्या मैदानावर पाहायला मिळाली होती, जेव्हा त्याने नाबाद 82 धावांची झुंजार खेळी साकारली होती.
पाकिस्तानी संघाचा स्टार खेळाडू बाबर आझमही या सामन्यात दिसणार नाही.(Babar Azam will not be seen in this match) त्यामुळेच भारताबरोबरच पाकिस्तानी चाहतेही तिकीट खरेदी करत नाहीत. बाबरचा भारताविरुद्ध एकूण विक्रम फारसा चांगला नाही, पण टी20 विश्वचषक 2021 मधील लीग सामना सर्वांच्या लक्षात आहे. त्या वेळी बाबरच्या कर्णधारपदाखाली पाकिस्तानने टीम इंडियाचा 10 विकेट्सने पराभव केला होता. त्या सामन्यात बाबरने नाबाद 68 धावांची खेळी केली होती.
माजी भारतीय कर्णधार रोहित शर्मा देखील या सामन्यात निवृत्ती घेतल्यामुळे मैदानावर दिसणार नाही. त्यामुळे चाहत्यांनी तिकीट खरेदी करण्यास कमी उत्साह दाखवला आहे. हिटमॅनकडे एकहाती सामना फिरवण्याची क्षमता आहे. जरी पाकिस्तानविरुद्ध त्याची एखादी संस्मरणीय टी20 खेळी नाही, तरीही हिटमॅनमध्ये चाहत्यांना स्टेडियमपर्यंत खेचून आणण्याची ताकद आहे.
माजी पाकिस्तानी कर्णधार मोहम्मद रिझवान सध्या संघाबाहेर असल्यामुळे तोदेखील या सामन्यात दिसणार नाही. भारताविरुद्ध रिझवानचा विक्रम उत्कृष्ट राहिला आहे. त्याने टीम इंडियाविरुद्ध 5 सामन्यांत 57 च्या सरासरीने 228 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोच्च खेळी नाबाद 79 धावांची आहे. रिझवानकडेही सामना बदलून टाकण्याची कला आहे. (Rizwan also has the ability to change the game)
Comments are closed.