Asia Cup 2025: टीम इंडिया दुबईकडे कधी रवाना होणार? स्पर्धेच्या तयारीबाबत मोठी अपडेट समोर
आशियन क्रिकेट कौन्सिल (ACC) आशिया कप 2025 (Asia Cup 2025) ची सुरुवात 9 सप्टेंबर रोजी दुबईत होणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा आधीच झाली आहे आणि संघात काही बदलही दिसून येत आहेत. भारतीय संघाने फेब्रुवारी 2025 नंतर अजून एकही टी20 सामना खेळलेला नाही. त्यामुळे क्रिकेट तज्ज्ञांना अपेक्षा होती की या स्पर्धेपूर्वी टीम इंडियाचा एक कॅम्प होऊ शकेल. याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे आणि त्याचबरोबर ती तारीखही कळली आहे ज्या दिवशी टीम इंडिया दुबईकडे रवाना होणार आहे.
न्यूज 24 च्या रिपोर्ट्सनुसार, टीम इंडिया 4 किंवा 5 सप्टेंबरला आशिया कप 2025 साठी दुबई रवाना होईल. तसेच हेही स्पष्ट झाले आहे की, स्पर्धेपूर्वी टीम इंडिया (Team india) कोणत्याही कॅम्पमध्ये भाग घेणार नाही. सर्व भारतीय खेळाडू आयपीएलनंतर थेट टी20 फॉरमॅटमध्ये खेळणार आहेत. त्यामुळे सगळ्यांच्या कामगिरीकडे लक्ष लागून राहणार आहे. याच स्पर्धेतून टीम इंडिया टी20 विश्वचषक 2026 च्या तयारीला सुरुवात करणार आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडू उत्तम कामगिरी करून संघात आपले स्थान पक्के करण्याचा प्रयत्न करेल. पाकिस्तानविरुद्ध चांगली खेळी करून हिरो बनण्याची मोठी संधी प्रत्येकाकडे असेल.
भारतीय संघाचा प्रवास या स्पर्धेत 10 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, जेव्हा भारताचा सामना युएईशी होईल. मात्र, सर्वात महत्त्वाचा सामना 14 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे आणि त्या वेळी टीम इंडियावर प्रचंड दबाव असेल. भारताचा तिसरा सामना 19 सप्टेंबर रोजी ओमानविरुद्ध खेळला जाणार आहे. या वेळेस भारतीय संघात शुबमन गिल (Shubman gill) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) बऱ्याच काळानंतर मैदानात दिसणार आहेत.
Comments are closed.