Monsoon Trip Trend: तरुणांमध्ये वाढतोय मान्सून ट्रिपचा ट्रेंड, पाहा काय सांगते आकडेवारी?
पावसाळा… हा ऋतू म्हणजे कडक उन्हातून दिलासा. काहींचा हा फेव्हरेट सिझन असतो तर काहींना पावसाळा अजिबात आवडत नाही. मात्र जे ट्रॅव्हल प्रेमी असतात त्यांच्यासाठी पावसाळा म्हणजे स्वर्गसुखच. कारण या ऋतूत सर्वत्र हिरवळ असते. डोंगरातून धबधबे वाहत असतात. या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घ्यायची अनेकांना हौस असते. आजकाल शहरात असे वातावरण क्वचितच पाहायला मिळते त्यामुळे अनेक जण शांत ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात या ऋतूचा आनंद घेण्यासाठी जातात. त्यामुळेच सध्या मान्सून ट्रिपच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. काही रिपोर्ट्समध्ये देखील याबाबत आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
GEN Z मध्ये मान्सून ट्रिपची वाढती क्रेझ
GEN Z म्हणजेच तरुणांमध्ये मान्सून ट्रिपची क्रेझ वाढत आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, या वर्षी मान्सून ट्रिप बुकिंगमध्ये 46% वाढ झाली आहे. थॉमस कुक इंडियाच्या मते, मान्सून ट्रिप आता अधिकाधिक लोकप्रिय होत चालली आहे. विशेषतः जनरेशन झेड, मिलेनियल्स, व्यावसायिक, तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच मान्सून ट्रिपचा आनंद लुटताना दिसतात. याशिवाय क्लिअरट्रिपच्या पीकएबू ट्रॅव्हल ट्रॅकरने सांगितले की, या वर्षी मान्सून ट्रिप बुकिंगमध्ये 46% वाढ झाली आहे. यापैकी 78% बुकिंग शहरांमधून केली जात आहे.
मान्सून ट्रिपचा ट्रेंड का वाढतोय?
- कडक उन्हापासून दिलासा देणारा पावसाळा हा थंड ऋतू असतो. त्यामुळे या दिवसात बाहेर पडून निसर्गाचे सौंदर्य अनुभवता येते.
- पावसाळ्यात सर्वत्र असलेली हिरवळ, धबधबे, डोंगरदऱ्याचे खुललेले सौंदर्य हे पर्यटकांसाठी आकर्षक ठरतात.
- पावसाळ्यात ट्रिपचा अनुभव हा थरारक असतो. वॉटर राफ्टिंग, ट्रेकिंग, जंगल सफारी यांसारख्या गोष्टी करता येतात. या गोष्टी जास्त तर तरुणांना आकर्षित करतात.
- पावसाळ्यात निसर्गरम्य ठिकाणी असलेले हॉटेल्स, रिसॉर्ट्समध्ये विशेष सवलती दिल्या जातात. ज्यामुळे पर्यटकांना फायदा होतो आणि त्यांची मान्सून ट्रिप ही अत्यंत बजेट फ्रेंडली होऊ शकते.
- सध्या सोशल मीडिया हे खूप प्रभावी माध्यम झाले आहे. अनेक पावसाळ्याच्या ठिकाणांचे व्हिडिओ, रिल्स सोशल मीडियावर दिसतात. ज्यामुळे सहज याबद्दल माहिती काढून तिथे व्हॅकेशन प्लॅन करू शकतो.
भारतातील मान्सून ट्रीपची ठिकाणे:
- केरळ
- कर्नाटक
- लोणावळा
- कोकण
- महाबळेश्वर
- गोवा
- शिलॉंग
- उदयपूर
Comments are closed.