आशिया कप 2025; विजेत्या संघावर होणार पैशांचा वर्षाव, बक्षीस रकमेत झाली कोट्यवधींची वाढ
आशिया कप 2025 ची सुरुवात आज म्हणजेच 9 सप्टेंबरपासून होत आहे. स्पर्धेचा पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात अबू धाबी येथे खेळला जाणार आहे. तर टीम इंडिया आपला मोहिमेचा पहिला सामना उद्या म्हणजेच 10 सप्टेंबरपासून खेळणार आहे. स्पर्धेतील सर्वाधिक प्रतिक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रविवारी 14 सप्टेंबरला रंगणार आहे.
आशिया कप 2025 मध्ये एकूण 8 संघ सहभागी होत आहेत, ज्यांना 4-4 अशा दोन गटांत विभागण्यात आलं आहे. ग्रुप-ए मध्ये भारत, पाकिस्तान, ओमान आणि यूएई आहेत. तर ग्रुप-बी मध्ये गतविजेता श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि हाँगकाँग या संघांचा समावेश आहे.
Asia एशिया कप 2025 चे बक्षीस पैसे 🚨 [PTI]
विजेते – 2.6 कोटी.
धावपटू – 1.3 कोटी.
मालिकेचा खेळाडू – 12.5 लाख. pic.twitter.com/up7ef6go67– जॉन्स. (@Criccrazyjhons) 9 सप्टेंबर, 2025
स्पर्धा सुरू होण्याआधीच सर्व संघांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. आशिया कप 2025 च्या बक्षीस रकमेत तब्बल 1 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
मागच्या वेळेस, जेव्हा श्रीलंकेने 2022 मध्ये टी20 स्वरूपात आशिया कप जिंकला होता, त्यावेळी त्यांना सुमारे 1.6 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली होती. तर उपविजेता ठरलेल्या पाकिस्तानला 79.66 लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं होतं.
तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर राहिलेल्या संघांना अनुक्रमे सुमारे 53 लाख आणि 39 लाख रुपये मिळाले होते.
मात्र, पीटीआयच्या माहितीनुसार 2026 च्या टी20 वर्ल्ड कपला लक्षात घेऊन एशियन क्रिकेट कौन्सिलने (ACC) या वेळेस बक्षीस रक्कम वाढवली आहे.
2022 टी20 आशिया कपच्या तुलनेत, या वर्षी विजेत्या संघासाठी बक्षीस रक्कम 2.6 कोटी रुपये आहे, जी अंदाजे 300,000 अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. म्हणजेच मागच्या वेळेपेक्षा जवळपास 1 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
तर उपविजेता संघाला 1.3 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, स्पर्धेच्या अखेरीस प्लेयर ऑफ द सिरीजला 12.5 लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे.
Comments are closed.