महिला वर्ल्ड कप 2025 विजेत्या टीमसाठी कोट्यवधींचं बक्षीस, पराभूत संघावरही होणार बक्षीसांचा वर्षाव!

महिला विश्वचषक 2025चा अंतिम सामना 2 नोव्हेंबर रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवला जाणार आहे (ICC women’s world cup 2025 INDW vs SAW). हा ऐतिहासिक सामना नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघ आपला पहिला विश्वविजेतेपद मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहेत.

या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत, कारण भारताने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 339 धावांचा प्रचंड लक्ष्य पाठलाग करत 5 गडी राखून विजय मिळवला. हा महिलांच्या विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठा रन चेस ठरला आहे.

आता सगळ्यांच्या मनात प्रश्न आहे विश्वविजेता बनणाऱ्या संघाला किती बक्षीस मिळणार? तर, महिला विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला 4.48 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स, म्हणजेच सुमारे ₹39.7 कोटी रुपये इतकं बक्षीस मिळणार आहे. तर अंतिम सामना हरलेल्या संघालाही 2.24 दशलक्ष डॉलर्स, म्हणजेच ₹19.8 कोटी रुपये इतकी इनामी रक्कम मिळेल.

याशिवाय, उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला 1.12 दशलक्ष डॉलर्स म्हणजे ₹9.9 कोटी रुपये दिले जातील. तर लीग स्टेजमध्ये सहभागी प्रत्येक संघाला 2.25 लाख डॉलर्स, म्हणजे ₹2.2 कोटी रुपये इतकी इनामी रक्कम मिळणार आहे.

Comments are closed.