भाजप-मिंधे राजवटीच्या लूटमारीला अंत नाही! अटल सेतूच्या दूरवस्थेबाबत आदित्य ठाकरे यांचा संताप

मुंबई ते नवी मुंबईदरम्यान सुलभ प्रवास करण्यासाठी अटल सेतू हा सागरी सेतू बांधण्याच आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या अटल सेतूचं लोकार्पण झाल्यानंतर वर्षभरातच याची दुरवस्था झाली आहे. याबाबत अनेक वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. या सेतूनवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून या रस्त्याने जाताना वाहनचालकांना तारवेरची कसरत करावी लागत आहे. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.
अटल सेटू नावाचे एमटीएचएल आमचे सरकार खाली पडले तेव्हा 82% पूर्ण होते.
मग फोकनथ मिंह आणि भाजप सरकारला आमच्या राज्यात भाग पाडले गेले.
रोड सर्फेसिंग सुरू झाले. उर्वरित कामांना 2 वर्षे लागली.
2024 मध्ये 6 महिन्यांच्या विलंबानंतर उद्घाटन झाले.
आता एक मध्ये खराब झाले… pic.twitter.com/ihatkqxtep
— Aaditya Thackeray (@AUThackeray) 19 सप्टेंबर, 2025
याबाबत त्यांनी एक्सवर पोसेट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आमचे सरकार पाडण्यात आले तेव्हा अटल सेतूचे 82% पूर्ण झाले होते. त्यानंतर फेकनाथ मिंधे आणि भाजप सरकार राज्यात बसवण्यात आले. त्यांच्या कार्यकाळात शिल्लक राहिलेल्या 18 टक्के कामाला तब्बल 2 वर्षे लागली. या विलंबानंतर अखेर २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या सेतूचे उद्घाटन करण्यात आले. या अटल सेतूच्या उद्घाटनानंतर एका वर्षातच रस्त्याची दूरवस्था झाली आहे. रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडले असून वाहनचावकांना ररस्त्याने जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. भाजप-मिंधे राजवटीच्या लूटमारीला अंत नाही, असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
Comments are closed.