भादा औसा परिसरात भूकंपाची अधिकृत नोंद नाही, जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये; प्रशासनाचे आवाहन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

भादा व औसा परिसरात शुक्रवारी भूगर्भातून आवाज आल्याची माहिती स्थानिक प्रशासनाला मिळाली होती. या घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाने तात्काळ एन‌.सी.एस.(National Center for Seismology (NCS), नवी दिल्ली यांच्याकडे पडताळणीसाठी पाठवली. त्यांच्या तपासणीनुसार भादा-औसा परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद झालेली नसल्याचे कळविण्यात आले आहे. त्यामुळे सदरील घटना भूगर्भातील नैसर्गिक हालचालींमुळे निर्माण होणाऱ्या आवाजाचा प्रकार असण्याची शक्यता आहे.

जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरून जाऊ नये व प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Comments are closed.