एलपीजी, पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा; घाबरून खरेदी करू नका

LPG, पेट्रोल-डिझेल पुरेसा साठा; घाबरून खरेदी करू नका

नवी दिल्ली -केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी देशभरात एलपीजी सिलिंडरच्या कमतरतेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी संसदेत स्पष्टीकरण दिले. भारताचा कच्चा तेलाचा पुरवठा पूर्णपणे सुरक्षित असल्यामुळे डिझेल, पेट्रोल, सीएनजी, पीएनजी किंवा एलपीजीबाबत घाबरण्याची गरज नाही, असे पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितले. आमच्याकडे तूर्तास कच्या तेलाचा पुरेसा साठा असल्यामुळे संपूर्ण भारतात पेट्रोल आणि डिझेलची कमतरता नाही. तसेच गॅस सिलिंडर पुरवठ्याबाबतही देशवासियांनी धास्ती बाळगण्याची गरज नसल्याचे आवाहन संसदेतून केले आहे.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी गुरुवारी लोकसभेतून गॅस आणि इंधन पुरवठ्याबाबत घाबरण्याची गरज नसल्याचे आश्वासन देशाला दिले. देशात पेट्रोल आणि डिझेलची कमतरता नाही आणि सीएनजीचा पुरवठा १०० टक्के अखंडित आहे. जागतिक अनिश्चितता असूनही, भारतात पुरेसा साठा आहे. मंत्र्यांनी जनतेला कोणत्याही अफवांकडे दुर्लक्ष करून घाबरून खरेदी टाळण्याचे आवाहन केले. सरकार परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून अखंडित पुरवठा सुनिश्चित करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आम्ही ४० देशांमधून कच्चे तेल आयात करत आहोत, भारत आखाती देशांमधून ६० टक्के एलपीजी आयात करतो, असे पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी सांगितले.

पेट्रोलियम मंत्री म्हणाले…
गॅसबाबत पॅनिक होण्याची गरज नाही; देशात पुरेसा गॅस साठा
दीर्घकाळ परिस्थिती हाताळण्यास तयारः सीएनजी पुरवठा १०० टक्के अखंडित

Comments are closed.