कोण बनणार भारताचा पुढील बॅटिंग कोच? सेहवागसह या माजी खेळाडूंचे नावं चर्चेत

मागच्या काही सामन्यांपासून टीम इंडियाच्या फलंदाजांची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे बीसीसीआय भारतीय संघासाठी नव्या फलंदाजी प्रशिक्षकाच्या शोधात असल्याची बातमी आहे. भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 3-1 ने पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या मार्गदर्शनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

ज्यावेळी गंभीरची नियुक्ती झाली, त्यावेळी अभिषेक नायर आणि रायन टेन डोइशेट यांची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून निवड झाली. वास्तविक, हे दोघे फलंदाजी प्रशिक्षक नाहीत. हे पद सध्या रिकामेच आहे. चला तर मग, या बातमीद्वारे अशा तीन खेळाडूंबद्दल जाणून घेऊया, जे टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून चांगली भूमिका पार पाडू शकतात.

मायकेल हसी – सध्या भारतीय संघाला अशा प्रशिक्षकाची गरज आहे, जो फलंदाजी मध्ये सुधारणा करून खेळाडूंमध्ये आत्मविश्वास आणू शकेल. ‘मिस्टर क्रिकेट’ या नावाने प्रसिद्ध असलेला मायकेल हसी ही भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडू शकतो. त्यानं वयाच्या 29 व्या वर्षी आंतराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. तेव्हापासून त्यानं जी पातळी गाठली, ती खूप मोठी आहे.

वीरेंद्र सेहवाग – भारतीय संघाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागनं एकेकाळी संपूर्ण जगाला आपल्या फलंदाजीच्या जोरावर वेड लावलं होतं. टीम इंडियाला त्याच्यासारख्या आक्रमक प्रशिक्षकाची गरज आहे. सेहवागनं तो कोणत्या फॉरमॅटमध्ये खेळतो, याकडे कधीच लक्ष दिलं नाही. त्याची खेळण्याची शैली नेहमी आक्रमकच राहिली आहे.

वसीम जाफर – भारतीय संघाचा माजी सलामीवीर वसीम जाफर याची आंतराष्ट्रीय कारकीर्द फारशी मोठी राहिली नाही. मात्र देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी उत्कृष्ट आहे. जाफर गेल्या काही वर्षांपासून प्रथम श्रेणी क्रिकेट कोचिंगमध्ये सक्रिय आहे. तो आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचा कोच देखील राहिला आहे. त्यामुळे त्याला या जबाबदारीचा चांगला अनुभव आहे.

हेही वाचा –

इंग्लंडच्या माजी खेळाडूला व्हायचंय भारताचा बॅटिंग कोच, टीम इंडियाविरुद्ध ठोकल्या आहे खोऱ्यानं धावा
“मी खूप भाग्यवान आहे की…”, टीम इंडियाचा स्टार गोलंदाज हिटमॅनचा मोठा चाहता
युवराज सिंगची कारकीर्द संपवणारा नियम पुन्हा लागू होणार! बीसीसीआय अ‍ॅक्शन मोडमध्ये

Comments are closed.