Asia Cup: हे 3 भारतीय फलंदाज आशिया कपमध्ये करू शकतात धावांचा वर्षाव, टी20 मधील मोठे विक्रम तुटणार?
आशिया कप 2025 (Asia Cup 2025) ची सुरुवात 9 सप्टेंबरपासून होणार आहे. या स्पर्धेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघ जाहीर झाला आहे. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली भारतीय संघ आशिया कपमध्ये कप जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. जवळपास एक वर्षानंतर शुबमन गिल (Shubman gill) संघात परतला आहे आणि त्याला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आपण पाहूया त्या तीन खेळाडू जे आशिया कपमध्ये धावांचा वर्षाव करू शकतात.
सूर्यकुमार यादव
कर्णधार सूर्याचा (Suryakumar Yadav) टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील रेकॉर्ड जबरदस्त आहे. त्याचा स्ट्राइक रेट तब्बल 167 आहे. अनेक सामन्यांमध्ये सूर्या भारतासाठी धडाकेबाज खेळी करून गेला आहे. आयपीएल 2025 मध्येही त्याने अप्रतिम कामगिरी केली होती.
मुंबई इंडियन्सकडून खेळताना सूर्यानं चौकार-षटकारांची आतषबाजी केली. या हंगामात तो दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. सूर्यानं 65.18 च्या सरासरीनं आणि जवळपास 168 च्या स्ट्राइक रेटनं 717 धावा केल्या होत्या.
शुबमन गिल
शुबमन गिल (Shubman gill) जवळपास एक वर्षानंतर भारतीय संघात परतला आहे. पण आशिया कपमध्ये तोही फलंदाजीने धडाका उडवू शकतो. गिलचा अलीकडचा फॉर्म उत्तम राहिला आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने 750 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या.
त्यापूर्वी आयपीएल 2025 मध्येही त्याने अप्रतिम फलंदाजी केली होती. तसेच त्याने 50 च्या सरासरीने 650 धावा केल्या आणि त्याचा स्ट्राइक रेट सुमारे 156 होता. गिलचा सध्याचा फॉर्म पाहता असं दिसतं आहे की, आशिया कपमध्येही त्याच्या बॅटमधून धावा बरसणार आहे.
टिळक वर्मा
डावखुरा फलंदाज तिलक वर्माने (Tilak Verma) भारतासाठी टी20 मध्ये उत्कृष्ट खेळी केली आहे. त्याने 25 सामन्यांत जवळपास 50 च्या सरासरीने 749 धावा ठोकल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 155.07 इतका जबरदस्त राहिला आहे. या दरम्यान त्यानं तीन अर्धशतकं आणि दोन शतकं झळकावली आहेत.
Comments are closed.