टी-20 फलंदाजी रँकिंगमध्ये ‘या’ 4 भारतीयांचे वर्चस्व; अभिषेक शर्मा अजूनही नंबर-1 वर, पाहा ताजी आकडेवारी

महिनभर चाललेल्या संघर्षानंतर भारतीय संघाने t20 विश्वचषक 2026 चे जेतेपद पटकावले. फायनलमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडचा ९६ धावांच्या विक्रमी अंतराने पराभव केला. संपूर्ण स्पर्धेत अभिषेक शर्माची बॅट फारशी चालली नसली, तरी फायनलमध्ये त्याने शानदार अर्धशतक झळकावले. दुसरीकडे, सूर्यकुमार यादवपासून ते ईशान किशनपर्यंतच्या फलंदाजांनी भारताला विश्वविजेते बनवण्यात मोलाचे योगदान दिले. टी-२० वर्ल्ड कपनंतर फलंदाजीच्या रँकिंगमध्ये कोणत्या ४ भारतीयांचे वर्चस्व आहे, ते येथे जाणून घ्या.

​आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटच्या फलंदाजी रँकिंगमध्ये अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव, ईशान किशन आणि तिलक वर्मा यांचा दबदबा पाहायला मिळत आहे. अभिषेक शर्माने वर्ल्ड कपमध्ये केवळ १४१ धावा केल्या असल्या तरी, त्याने आपले पहिले स्थान सुरक्षित राखले आहे. मात्र, त्याच्या रेटिंग पॉइंट्समध्ये पूर्वीपेक्षा मोठी घट झाली आहे. दुसरीकडे, वर्ल्ड कपमध्ये ३१७ धावा करणाऱ्या ईशान किशनने रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

​तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या रँकिंगमध्ये जरी घसरण झाली असली, तरी ते अजूनही टॉप-१० मध्ये कायम आहेत. तिलक वर्मा एका स्थानाने खाली घसरून सातव्या क्रमांकावर आला आहे, तर कर्णधार सूर्यकुमार यादव दोन स्थानांच्या घसरणीसह ९ व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

च्यासंजू सॅमसन टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या पाच डावांत ३२१ धावा केल्या आणि तो संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला. सलग तीन सामन्यांत प्रभावी अर्धशतकी खेळी केल्यामुळे त्याला रँकिंगमध्ये मोठा फायदा झाला आहे. सॅमसन आता टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जगातील २२ व्या क्रमांकाचा फलंदाज बनला आहे. त्यांच्या व्यतिरिक्त शिवम दुबे आता जगातील २७ व्या क्रमांकाचा टी-२० फलंदाज बनला आहे

Comments are closed.