भारत-इंग्लंड मालिकेत गाजवले मैदान, पण आता 5 भारतीय खेळाडूंचा आशिया कप 2025 मधून पत्ता कटणार?
आशिया कप: भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांची कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली. या मालिकेत अनेक भारतीय खेळाडूंनी आपले दमदार कामगिरी केली. शुबमन गिल सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आणि त्याला ‘प्लेअर ऑफ द सिरीज’चा पुरस्कारही मिळाला. याशिवाय केएल राहुल आणि जसप्रीत बुमराहनेही शानदार खेळ दाखवला. मात्र, या मालिकेत धमाकेदार कामगिरी करणाऱ्या 5 खेळाडूंना आशिया कप 2025 मधून वगळले जाऊ शकते. (Asia Cup 2025 squad)
शुबमन गिल– या यादीत पहिले नाव शुबमन गिलचे आहे. आशिया कप 2025 मधून भारतीय कसोटी कर्णधाराला वगळले जाण्याची शक्यता आहे. कारण, गिल सध्या टी20 संघाचा भाग नाही. दुसरीकडे, भारतासाठी टी20 फॉरमॅटमध्ये संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माने गेल्या काही महिन्यात सलामीवीर म्हणून उत्कृष्ट फलंदाजी केली आहे. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंकडे दुर्लक्ष करता येणार नाही. म्हणूनच गिलच्या खेळण्यावर संशय कायम आहे. (Shubman Gill Asia Cup)
केएल राहुल- केएल राहुल बऱ्याच काळापासून भारतीय टी20 संघातून बाहेर आहे. त्याने भारतासाठी शेवटचा टी20 सामना 2022 मध्ये खेळला होता. गिल आता या फॉरमॅटचा भाग नाही, परंतु राहुलच्या खेळण्याची शक्यताही कमी आहे. (KL Rahul T20 comeback)
यशस्वी जयस्वाल- इंग्लंड दौऱ्यावर 2 शतके झळकावणारा यशस्वी जयस्वाल दुलीप ट्रॉफी 2025 मध्ये खेळणार आहे. तो वेस्ट झोनकडून खेळेल. त्यामुळे त्याच्या आशिया कपमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे. शिवाय, टी20 फॉरमॅटमध्ये भारताकडे आधीच अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनसारखे खेळाडू आहेत. अशा परिस्थितीत त्याचे आशिया कप 2025 मध्ये खेळणेही कठीण आहे. (Yashasvi Jaiswal Duleep Trophy)
षभ पंत- रिषभ पंतने इंग्लंडविरुद्ध 4 कसोटी सामने खेळले आणि जवळपास सर्व सामन्यांमध्ये या यष्टीरक्षक फलंदाजाने शानदार फलंदाजी केली. मात्र, मँचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या सामन्याच्या पहिल्या डावात तो जखमी झाला. स्कॅनमध्ये त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचे समोर आले. त्यामुळे आशिया कप 2025 पूर्वी त्याचे फिट होणे कठीण आहे. म्हणूनच त्याचे बाहेर होणे जवळजवळ निश्चित आहे. (Rishabh Pant injury update)
जसप्रीत बुमराह- जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत केवळ 3 सामन्यांमध्ये भाग घेतला होता. कामाचा ताण लक्षात घेता, बुमराहलाही आशिया कप 2025 मधून बाहेर ठेवले जाऊ शकते आणि त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याने खेळलेल्या 3 सामन्यांमध्ये 26च्या सरासरीने 14 विकेट्स घेतल्या होत्या. (Jasprit Bumrah workload)
Comments are closed.