चॅम्पियन्स ट्रॉफी संपल्यावर रिटायरमेंट घेऊ शकणारे 5 क्रिकेटर्स
मिनी वर्ल्ड कप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचे यंदाच्या स्पर्धेत 8 सामने खेळले गेले आहेत. पाकिस्तान या स्पर्धेचे आयोजन करत आहे. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव भारत आपले सामने दुबईमध्ये खेळत आहे. भारतीय संघ आणि न्यूझीलंड संघाने आतापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तर पाकिस्तान आणि बांगलादेश संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.
सध्या या स्पर्धेत सर्वांच्या नजरा अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियावर आहेत. ज्यात काही खेळाडू फॉर्ममध्ये परतले आहेत. संघाने शानदार कामगिरी केली आहे, परंतु काही मोठ्या क्रिकेटपटूंचा फाॅर्म आणखी खराबच आहे. अशा परिस्थितीत, काही क्रिकेटपटू या स्पर्धेनंतर निवृत्ती देखील घेऊ शकतात. चला तर या बातमीद्वारे जाणून घेऊयात की, चॅम्पियन्स ट्राॅफी 2025 नंतर कोणते क्रिकेटर्स निवृत्ती घेऊ शकतात.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 संपताच हे दिग्गज निवृत्त होऊ शकतात
1. जो रूट – इंग्लंड
इंग्लंड संघाचा स्टार फलंदाज जो रूट आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात जो रूटने 68 धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात त्याने अफगाणिस्तानविरुद्ध 120 धावा केल्या.
पण जो रूटच्या वाढत्या वयामुळे, 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी संपताच तो निवृत्तीची घोषणा करू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, काही काळापूर्वी त्यांच्या निवृत्तीची चर्चा शिगेला पोहोचली होती. परंतु त्यांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला.
2. मुशफिकूर रहीम – बांगलादेश
37 वर्षीय यष्टीरक्षक-फलंदाज मुशफिकुर रहीमची चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आतापर्यंत खेळलेल्या दोन सामन्यांमध्ये कामगिरी खराब राहिली आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात तो आपले खातेही उघडू शकला नाही. तर न्यूझीलंडविरुद्ध तो फक्त 2 धावा काढून स्वस्तात परतला. अशा परिस्थितीत, त्याच्या खराब फॉर्ममुळे, तो 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर निवृत्तीची घोषणा करू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.
3. ग्लेन मॅक्सवेल – ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलियन संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात फलंदाजीने नाबाद 32 धावांची खेळी खेळली. त्याच वेळी, त्याने गोलंदाजीत एक विकेट देखील घेतली. पण ग्लेन मॅक्सवेलचे वाढते वय लक्षात घेता, तो निवृत्तीची घोषणा करू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.
4. फखर झमान – पाकिस्तान
पाकिस्तान संघाचा स्टार सलामीवीर फखर झमान 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात जखमी झाला. यानंतर तो स्पर्धेतून बाहेर पडला. स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर फखरने पोस्ट शेअर केली. त्याच्या पोस्टवरून असे मानले जात आहे की ते लवकरच निवृत्तीची घोषणा करू शकतात. फखरने इंस्टाग्रामवर लिहिले की, सर्वात मोठ्या व्यासपीठावर पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणे हे या देशातील प्रत्येक क्रिकेटपटूसाठी स्वप्नासारखे आहे आणि हा एक सन्मान आहे.
मला अभिमान आहे की मला इतक्या वेळा पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला. दुर्दैवाने, मी आता आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधून बाहेर आहे, पण अर्थातच, मी अल्लाहचे खूप आभारी आहे. आता मी घरी बसून हिरवे कपडे घालून माझ्या संघाला पाठिंबा देईन. ही फक्त सुरुवात आहे, पुनरागमन या पराभवापेक्षा अधिक मजबूत असेल. असं तो म्हणाला. पण वास्तविक पाकिस्तान या चॅम्पियन्स ट्राॅफीतून बाहेर झाला आहे.
भारतीय संघाकडून, चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली निवृत्त होण्याची शक्यता कमी आहे. असे मानले जाते की दोन्ही फलंदाज 2027 चा एकदिवसीय विश्वचषक खेळताना दिसू शकतात.
हेही वाचा-
सचिनचा विक्रम मोडण्याच्या मार्गावर विराट, नवा इतिहास रचण्याची संधी!
आयसीसी स्पर्धांमध्ये न्यूझीलंड भारतासाठी ‘कठीण प्रतिस्पर्धी’, आकडेवारी काय सांगते?
IPL: मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! हंगाम सुरू होण्यापूर्वी जसप्रीत बुमराह तंदुरुस्त?
Comments are closed.