Protein Deficiency : प्रोटीनच्या कमतरतेमुळे होतात हे आजार
शरीर तंदुरुस्त आणि मजबूत होण्यासाठी शरीरात प्रोटीन असणे आवश्यक आहे. प्रोटीनमुळे स्नायू बळकट होतात शिवाय विविध संसर्गापासून शरीराचा बचाव होतो. त्यामुळे आपण जे खातो, त्यापदार्थांमार्फत शरीरात प्रोटीन जाणे आवश्यक आहे. जर शरीरात प्रोटीनचा अभाव निर्माण झाला तर आरोग्याच्या विविध तक्रारी उद्भवू शकतात. शरीराची वाढ थांबू शकते, रोगप्रतिकारकशक्ती कमी होऊ शकते, थकवा जाणवतो, संधिवात सुरू होतो. त्यामुळे शरीराच्या विकासासाठी प्रोटीन महत्त्वाचा घटक मानला जातो. आज आपण जाणून घेऊयात, प्रोटीनच्या अभावामुळे कोणते आजार होऊ शकतात आणि त्याची लक्षणे कोणती
लक्षणे –
- थकवा
- केसगळती
- जखम भरण्यास वेळ लागणे
- रोगप्रतिकारकशक्ती कमजोर होणे
आजार –
अशक्तपणा (Anaemia)
शरीरात प्रोटीनच्या कमतरतेमुळे अशक्तपणा जाणवू शकतो. प्रोटीनच्या कमतरतेमुळे शरीरात लालपेशी तयार होत नाही. परिणामी, शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते. या स्थितीला वैद्यकिय भाषेत एनीमिया असे म्हटले जाते. ज्यामुळे थकवा जाणवतो.
कुपोषण (विवाहित)
शरीरात प्रोटीनच्या अभावामुळे कुपोषणाचा धोका निर्माण होतो. कुपोषण जास्त करून लहान मुलांमध्ये आढळणारा आजार आहे. कुपोषणामुळे मुलांच्या शरीराचा विकास होत नाही आणि त्यांचे वजन अचानक कमी होऊ लागते.
फॅटी लिवर (Fatty Liver)
शरीरात प्रोटिनच्या अभावामुळे लिवर सेल्समध्ये चरबी वाढू लागते. ज्यामुळे फॅटी लिवरची समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हाला असा काही आजार असेल तर त्वरीत उपचार सुरू करा, अन्यथा लिवर डॅमेज होऊ शकते.
रोगप्रतिकारकशक्तीवर परिणाम (Weak Immunity Power)
प्रोटीनच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. परिणामी, वारंवार सर्दी-खोकला, वायरल इन्फेक्शन होऊ शकते.
काय खाल?
प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी प्रोटीनयुक्त पदार्थ खाणे आवश्यक आहे. तुम्ही दूध, दही, पनीर, डाळ, सोयाबीन, अंडी, मासे, चिकन, सुकामेवा, बिया यांचा आहारात समावेश करू शकता.
हेही पाहा –
Comments are closed.