Asia Cup 2025: भारतीय संघातील सर्वाधिक स्ट्राइक रेट असलेला फलंदाज कोण? सूर्यकुमार नाही तर 'हा' खेळाडू टॉपला
एशिया कप 2025: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आगामी टी20 आशिया चषक 2025 साठी 19 ऑगस्ट रोजी भारतीय संघाची घोषणा केली. स्पर्धेसाठी भारतीय संघातील अनेक खेळाडूंची नावे निश्चित होती, तर काही नावांवर जोरदार चर्चा सुरू होती. यामध्ये टीम इंडियाचा कसोटी कर्णधार शुबमन गिलचाही समावेश होता, ज्याला आशिया चषक संघांत केवळ स्थानच मिळाले नाही, तर उपकर्णधारपदाची जबाबदारीही देण्यात आली.
दुसरीकडे, श्रेयस अय्यर आणि यशस्वी जैस्वालसारख्या दमदार खेळाडूंना संघात जागा मिळाली नाही. टी20 फॉरमॅटमध्ये कोणत्याही फलंदाजाचा स्ट्राइक रेट सर्वात महत्त्वाचा असतो, अशा परिस्थितीत आशिया चषक संघात समाविष्ट असलेल्या भारतीय फलंदाजांपैकी कोणाचा स्ट्राइक रेट सर्वाधिक आहे आणि कोणाचा सर्वात कमी आहे, हे जाणून घेऊया. (Indian cricketers T20 strike rate)
भारतीय संघाचा 24 वर्षीय डावखुरा सलामीवीर अभिषेक शर्मा सध्या आंतरराष्ट्रीय टी20 फलंदाजी क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. (Abhishek Sharma T20 rank) अभिषेकच्या आक्रमक फलंदाजीमुळे प्रतिस्पर्धी संघाचे गोलंदाज सामना सुरू होण्यापूर्वीच दबावात दिसतात. अभिषेकने आतापर्यंत 17 टी20 सामने खेळले असून 535 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 193.85 आहे, जो आशिया चषक संघात असलेल्या सर्व खेळाडूंमध्ये सर्वाधिक आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर कर्णधार सूर्यकुमार यादव आहे, ज्याने टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 167.08च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. (Suryakumar Yadav strike rate)
रिंकू सिंग, ज्याने कमी वेळात टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे, त्याचा स्ट्राइक रेट 161.07 आहे. त्याचप्रमाणे, आतापर्यंत 25 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या तिलक वर्माने 155.08च्या स्ट्राइक रेटने 749 धावा केल्या आहेत. (Rinku Singh strike rate)
आशिया चषक 2025 मध्ये भारतीय संघाचा उपकर्णधार शुबमन गिल स्ट्राइक रेटच्या बाबतीत इतर फलंदाजांच्या तुलनेत सर्वात खाली आहे. गिलने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 21 सामने खेळले असून 30.42च्या सरासरीने 578 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 139.28 राहिला आहे. या बाबतीत संजू सॅमसन, शिवम दुबे, हार्दिक पांड्या आणि जितेश शर्मा यांच्यापेक्षाही गिल मागे आहे.
आशिया चषक 2025 मध्ये भारतीय संघाच्या फलंदाजांचा स्ट्राइक रेट
अभिषेक शर्मा – 193.85
सूर्यकुमार यादव – 167.08
रिंकू सिंग – 161.07
टिलाक वर्मा – 155.08
संजू सॅमसन – 152.39
जितेश शर्मा – 147.06
हार्दिक पांड्या – 141.68
शिवम दुबे – 140.11
शुबमन गिल – 139.28
Comments are closed.